Small Indian Civet Rescued : विहिरीत पडलेल्या उदमांजराची सुखरूप सुटका
Small Indian Civet Rescued : सर्पमित्र अविनाश जाधव आणि मयूर कुंभार यांच्या कार्याचे ग्रामस्थांकडून कौतुक

पेठ (सांगली) – मांजर्डे (ता. तासगाव) येथील दत्तनगर परिसरातील ऋतुराज मोहिते यांच्या शेतातील विहिरीत एक उदमांजर पडल्याची माहिती मिळताच सर्पमित्र अविनाश जाधव व सर्पमित्र मयूर कुंभार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत त्यास सुखरूपपणे विहिरीबाहेर काढले.
योग्य नियोजन व सुरक्षित बचाव पद्धतीचा अवलंब करून दोन्ही सर्पमित्रांनी उदमांजराला कोणतीही इजा न होता विहिरीतून सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर त्याची प्रकृती तपासून वन्यजीवांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्याला नैसर्गिक अधिवासात, वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले.
या धाडसी व तत्पर बचावकार्यात सर्पमित्र अविनाश जाधव आणि सर्पमित्र मयूर कुंभार यांच्या कार्याचे ग्रामस्थांनी कौतुक केले. वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी अशा प्रकारच्या बचाव मोहिमा अत्यंत महत्त्वाच्या असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हेही वाचा:





