Satara: कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार
Satara सातारा कऱ्हाडे ब्राह्मण संघाची वार्षिक सभा येथील लक्ष्मीनारायण कार्यालयात रविवारी उत्साहात झाली. प्रारंभी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले.

Satara: कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने झालेल्या वार्षिक सभेत दहावी व बारावी परीक्षेतील गुणवंतांचा सत्कार करणयात आला. या सभेत संघाचे माजी कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्ते श्रीराम नानल यांचा ज्येष्ठ उद्योजक अनिल काटदरे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
सातारा कऱ्हाडे ब्राह्मण संघाची वार्षिक सभा येथील लक्ष्मीनारायण कार्यालयात रविवारी उत्साहात झाली. प्रारंभी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संघाचे दिवंगत सदस्य व येथील हॉटेल व्यावसायिक कै. नितीन सुपनेकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघाच्या सचिव उत्तरा पराडकर यांनी प्रास्ताविक करुन 2025- 26 वर्षातील अहवाल सादर केला.
संघाने वर्षभरात केलेल्या वाटचालीची व अनेक सामाजिक उपक्रमांची माहिती पराडकर यांनी दिली. गिरीश बोन्द्रे यांनी सभेसमोर 2025- 26आर्थिक वर्षाचा ताळेबंद मांडून त्यास मंजुरी घेतली. यानंतर दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवलेल्या विद्यार्थांचा बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. संघाचे अध्यक्ष बाळासाहेब भाटे यांनी अध्यक्षीय भाषणात संघाच्या कार्याचा आढावा घेऊन सभासदांना मार्गदर्शन केले. सुधीर करंबेळकर यांनी आभार मानले. विद्यार्थ्यांच्या सत्कारानंतर संघाचे माजी कार्यकारिणी सदस्य श्रीराम नानल यांचाही अध्यक्षांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभेच्या आयोजनामध्ये कार्यकारिणी सदस्य सौ. मंजुषा तळवलकर, विद्याधर खांडेकर, विजया फणसळकर यांचेही योगदान लाभले.
सातारा- कऱ्हाडे ब्राह्मण संघाच्यावतीने झालेल्या कार्यक्रमात झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानतर पदाधिकारी डावीकडून विद्याधर खांडेकर, विजया फणसळकर, सौ. मंजुषा तळवळकर, सुधीर करंबेळकर, गिरीश बोंद्रे, बाळासाहेब भाटे, उत्तरा पराडकर.





