SA vs PAK : दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानात ऐतिहासिक विजय! १८ वर्षांनंतर कसोटीत केला खास पराक्रम

SA vs PAK South Africa Clinches Historic Test Win After 18 Years : पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना रावळपिंडीच्या मैदानावर पार पडला. रँक टर्नर खेळपट्टीवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने ९ गडी राखून विजय मिळवत मालिका १-१ ने बरोबरीत आणली. हा दक्षिण आफ्रिकेचा पाकिस्तानात १८ वर्षांनंतरचा पहिला कसोटी विजय ठरला.
पाकिस्तानने सामन्यासाठी रँक टर्नर खेळपट्टी तयार केली होती, पण त्यांचे खेळाडू स्वतःच्याच जाळ्यात अडकले. पहिल्या डावात पाकिस्तानने ३३३ धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने ४०४ धावा करत ७१ धावांची आघाडी घेतली. दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजीत ट्रिस्टन स्टब्सने ७६, टॉनी जे जॉर्जीने ५५, मुथुसामीने नाबाद ८९, तर कगिसो रबाडाने ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.
मुथुसामी आणि रबाडा यांनी १०व्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी –
The World Test Champions are back to winning ways! 💪🏆
Proteas bounce back strong to defeat Pakistan and level the series 1-1. 🔥🇦🇺🏏#SAvsPAK #TestCricket pic.twitter.com/rTf82Slo7W
— Mr. Cricket UAE (@mrcricketuae) October 23, 2025
मुथुसामी आणि रबाडा यांनी १०व्या विकेटसाठी ९८ धावांची भागीदारी करत संघाला मजबूत स्थितीत नेले. याआधी केशव महाराज आणि मुथुसामी यांनी ९व्या विकेटसाठी ७१ धावांची भागीदारी केली होती. दक्षिण आफ्रिकेकडून गोलंदाजीत केशव महाराजने पहिल्या डावात ७ आणि दुसऱ्या डावात २ बळी घेतले, तर सायमन हार्मरने पहिल्या डावात २ आणि दुसऱ्या डावात ६ बळी घेत पाकिस्तानच्या फलंदाजीला खिंडार पाडले.
हेही वाचा – IND vs AUS : विराटने दिले निवृत्तीचे संकेत? सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरल्यानंतर VIDEO व्हायरल
पाकिस्तानचा दुसरा डाव १३८ धावांवर आटोपला –
पाकिस्तानचा दुसरा डाव १३८ धावांवर आटोपला. बाबर आझमने ५० आणि मोहम्मद रिझवानने १८ धावा केल्या, पण चौथ्या दिवशी बाबर बाद झाल्याने पाकिस्तानची आशा मावळली. दक्षिण आफ्रिकेपुढे ६८ धावांचे आव्हान होते, जे रेयान रिकल्टन (२५) आणि कर्णधार एडेन मारक्रम (४२) यांनी सहज पूर्ण केले.
हेही वाचा – IND vs AUS : रोहित शर्माने अॅडलेडमध्ये रचला इतिहास, गांगुली-गिलख्रिस्टला टाकलं मागे!
दक्षिण आफ्रिकेने ९ गडी राखून हा सामना जिंकला. हा विजय दक्षिण आफ्रिकेसाठी ऐतिहासिक ठरला, कारण त्यांनी १८ वर्षांनंतर पाकिस्तानच्या भूमीवर कसोटी सामना जिंकला. या मालिकेतील रोमांचक लढतीनंतर आता दोन्ही संघांचे लक्ष पुढील आव्हानांवर असेल.





