S.Chockalingam : निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी १०० टक्के मतदार मॅपिंग (नकाशांकन) करणे ही काळाची गरज असल्याचे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम (S.Chockalingam) यांनी म्हटले आहे. तसेच, या आघाडीवर महाराष्ट्र राज्य इतर राज्यांच्या तुलनेत काहीसे मागे असल्याचेही त्यांनी (S.Chockalingam) मान्य केले. विशेष सखोल आढावा बैठकीत ते बोलत होते. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणि अचूकता आणण्यासाठी मतदार याद्यांचे १०० टक्के मॅपिंग करणे ही काळाची गरज आहे. ९० ते ९४ टक्क्यांचा जादुई आकडा गाठण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने पूर्ण समर्पणाने काम केले पाहिजे. मतदार यादीच्या मॅपिंगमध्ये महाराष्ट्र इतर राज्यांच्या तुलनेत काहीसा मागे असल्याचे त्यांनी नमूद केले. S.Chockalingam तसेच, ठाणे आणि पालघरसारख्या जिल्ह्यांमध्ये या कामात अधिक वेगाने प्रगती होण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी (S.Chockalingam) सांगितले. त्रुटीमुक्त मतदार याद्या तयार करण्यासाठी आणि निवडणूक विषयक माहिती अद्ययावत करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात या महिन्यात विशेष सखोल पडताळणी(एसआयआर) मोहीम सुरू होणार आहे. तंत्रज्ञान आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कामाचा मेळ घालण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच, पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी बूथ-स्तरीय अधिकारी आणि निवडणूक कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन पडताळणी करावी आणि जिओ-टॅग छायाचित्रांची नोंद ठेवावी असे निर्देश त्यांनी दिले. मागील मतदार याद्यांच्या आधारे मतदारांचे मॅपिंग करणे आणि त्यांच्या मूळ वास्तव्याची पडताळणी करणे हाच या मोहिमेचा मुख्य आधार आहे. तसेच, पडताळणीच्या वेळी घरी उपस्थित नसलेल्या मतदारांच्या घराबाहेर नोटीस लावण्यात यावेत आणि त्याची रीतसर नोंद ठेवली जावी असेही त्यांनी सांगितले. एकाच नावाची दुबार नोंद आणि अस्पष्ट छायाचित्रे यांसारख्या समस्या दूर करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तातडीने सुधारणात्मक पावले उचलणे आवश्यक आहे. निवडणूक आयोग आपल्या अधिकारांचा वापर केवळ पात्र भारतीय नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठीच करत आहे, याबद्दल कोणाच्याही मनात कोणतीही शंका असू नये, असे चोक्कलिंगम (S.Chockalingam) यांनी ठामपणे सांगितले.