Shubham Dubey : सरकारी नोकरीसाठी क्रिकेट खेळायला सुरुवात केली अन् थेट ‘करोडपती’ झाला! राजस्थानच्या नव्या फिनिशरचे विदर्भाशी खास कनेक्शन
Shubham Dubey : राजस्थान रॉयल्सचा फिनिशर शुभम दुबे याची संघर्षगाथा कोणत्याही चित्रपटाला शोभेल अशीच आहे.

Who is Shubham Dubey and his Rajasthan Royals Story : यवतमाळच्या मातीतून आलेल्या एका तरुणाने आयपीएलच्या लखलखत्या जगात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजस्थान रॉयल्सचा फिनिशर शुभम दुबे याची संघर्षगाथा कोणत्याही चित्रपटाला शोभेल अशीच आहे. पान टपरी चालवणाऱ्याचा मुलगा ते करोडपती क्रिकेटर, हा प्रवास थक्क करणारा आहे.
आयपीएल २०२६ च्या हंगामात राजस्थान रॉयल्ससाठी ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून चमकणारा शुभम दुबे सध्या विदर्भाचा अभिमान ठरला आहे. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात त्याने ज्या पद्धतीने फिनिशरची भूमिका बजावली, त्यामागे अनेक वर्षांची धडपड आणि डोळ्यांतील अश्रू लपलेले आहेत. त्याच्या संघर्षमय क्रिकेट प्रवासाबद्दल जाणून घेऊया.
सरकारी नोकरीच्या ओढीतून क्रिकेटमध्ये एन्ट्री
Shubham Dubey also didn’t complete the chase against RCB,KKR & LSG last year
didn’t play too much domestic cricket this season
This knock & contribution against LSG means a lot for him
The Missing link in this team pic.twitter.com/yfiWR51HW5
— RRweiser (@ibn__e_battuta) April 28, 2026
२७ ऑगस्ट १९९४ रोजी यवतमाळमध्ये जन्मलेल्या शुभमची घरची परिस्थिती अत्यंत बेताची होती. वडील नागपुरात पान टपरी चालवायचे. शुभमने सुरुवातीला सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही. अखेर, स्पोर्ट्स कोट्यातून नोकरी मिळवता येईल या आशेने तो क्रिकेटकडे वळला. आईला दिलेला तो शब्द आज त्याने पूर्ण केला आहे, पण एका वेगळ्या उंचीवर!
टेनिस बॉल ते ५.८ कोटींची बोली –
Shubham Impact Dubey right till the end! 💗
He needed to step up and take us over the line. And he did! Watch Dubey wrap up #PBKSvRR for us 🎥 pic.twitter.com/VTXK7awUae
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 29, 2026
शुभमचा प्रवास टेनिस क्रिकेटपासून सुरू झाला. सुरुवातीला हातामध्ये ग्लोव्ह्ज घेण्यासाठीही पैसे सायचे, अशा वेळी मित्रांनी त्याला मोलाची मदत केली. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्थानिक सामन्यांमध्ये त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. २०२४ च्या लिलावात ५.८ कोटींची बोली लागल्यावर तो रातोरात प्रकाशझोतात आला. सध्या तो कमी किंमतीत (८० लाख) राजस्थानच्या ताफ्यात असला तरी, त्याची मैदानातील कामगिरी मात्र अमूल्य आहे.
हेही वाचा – Vaibhav Sooryavanshi Reply : ‘देवानेच लावून दिलीये चिप…!’, बॅटमध्ये ‘AI’ चिप असल्याचा दावा करणाऱ्या पाकिस्तानी विश्लेषकाची वैभवने केली बोलती बंद
धोनी-युवराजचा चाहता-
Whether we win, whether we lose 🥹💗 pic.twitter.com/XaXjq21fhC
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 28, 2026
शुभम स्वतःला एमएस धोनी, युवराज सिंग, गौतम गंभीर आणि सौरव गांगुली यांचा चाहता मानतो. धोनीसारखे थंड डोके, युवराजसारखी फटकेबाजी आणि गांगुलीसारखा आत्मविश्वास ही त्याची वैशिष्ट्ये आहेत. पंजाबविरुद्धच्या सामन्यात त्याने हे सर्व गुण दाखवत राजस्थानच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. विदर्भाचा हा ‘इम्पॅक्ट प्लेयर’ आगामी काळात भारतीय संघाचे दरवाजे ठोठावणार, यात शंका नाही.





