Rupali Thombre Vs Rupali Chakankar | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत महिला प्रदेशाध्यक्ष तथा महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर आणि पक्षाच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे या दोन महिला नेत्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरु आहे. फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणांमध्ये चाकणकर यांनी तरुणीचं चारित्र्यहनन केला असल्याचा आरोप करत रुपाली ठोंबरे यांनी चाकणकर यांच्याविरोधात आंदोलन केले होते. या दोन्हीही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेल्या वादाची दखल आता पक्षाने घेतली आहे. त्याबाबत रुपाली ठोंबरे यांना पक्षाकडून कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. चाकणकर यांच्या भूमिकेवर रुपाली ठोंबरेंकडून अनेकदा टीका रुपाली ठोंबरे यांना पक्षाने प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती. त्यामुळे त्यांच्यावर पक्षाची भूमिका मांडण्याची जबाबदारी होती. मात्र, रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा जाहीरपणे रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध भूमिका घेतली होती. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवर रुपाली ठोंबरे यांनी अनेकदा टीका केली होती. मात्र आता आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर टीका करणं रूपाली ठोंबरे यांना अखेर महागात पडल्याचं दिसतयं. Rupali Thombre Vs Rupali Chakankar | संघटक सरचिटणीस संजय खोडके रूपाली ठोंबरे यांना ही नोटीस पाठवली आहे. या नोटीसीमध्ये आपणास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली असताना आपण राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष व पक्षाच्या महिलाध्यक्षा यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेले वक्तव्य हे पक्षशिस्त भंग करणारे आहे. आपल्या विरुद्ध शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये, याचा खुलासा ७ दिवसांत करण्यास सांगितले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याचा खुलासा मागवला या पत्राची प्रत शेअर करत रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं की, “आज रात्री पक्षाकडून जगातील महिलांना न्याय देणाऱ्या महिला आयोगाच्या अध्यक्षाविषयी केलेल्या वक्तव्याविषयी खुलासा मागण्यात आलेला आहे. खरं तर खुलासा देण्याची वेळ 7 दिवस अत्यंत कमी वेळ देण्यात आली आहे. मी वैयक्तिक हितसंबध, हगवणे प्रकरण ते आमच्या भगिनी कैलासवाशी डॉक्टर संपदा मुंडेंच्या चारित्र्यहनन प्रकरणापर्यंतचा सविस्तर खुलासा देईन. ज्यांनी मयत भगिनीचे चारित्र्यहनन केले त्याच्या विषयी खरतरं काय खुलासा द्यावा?” असे म्हंटले. Rupali Thombre Vs Rupali Chakankar | हेही वाचा: “एकनाथ खडसेंना ज्यामुळे राजीनामा द्यावा लागला तो व्यक्ती….”; पुण्यातील जमीन प्रकरणात धक्कादायक माहिती समोर