Eknath Khadse : पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. राजकीय वर्तुळात देखील या प्रकरणावरून राजकीय नेत्यांची वक्तव्ये समोर येत आहेत. काल दिवसभर मोठ्या घडामोडी घडल्या. त्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द केला जाईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आता या प्रकरणात आणखी एक मोठी माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरण गाजत आहे. या प्रकरणात आतापर्यंत नऊ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नऊ जणांमध्ये एक नाव असे आहे की ज्या नावाचे कनेक्शन माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या भोसरी येथील जमीन व्यवहाराशी संबंधित आहे. हेमंत गावंडे या बांधकाम व्यावसायिकांचा देखील यामध्ये समावेश आहे. त्यांच्यावर व्हीजन प्रॉपर्टीज आणि अमेडीया कंपनीने राज्य सरकारची एग्रीकल्चर डीपार्टमेंटची साडेपाच हेक्टर जागा हडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे एकनाथ खडसेंच्या भोसरी जमीन घोटाळ्यात ज्यांनी व्हीसल ब्लोअरची भूमिका बजावली होती. तेच हे हेंमत गावडे आहेत. एकनाथ खडसे हे सत्तेत असताना या प्रकरणामुळे त्यांना आपल्या पदावरून पायउतार होत राजीनामा द्यावा लागला होता. पार्थ पवार यांच्याशी संबंधित जमीन प्रकरणावर खडसेंनी आक्रमक भूमिका घेतली असून पत्रकार परिषद ते घेणार आहेत. यामुळे या प्रकरणात खडसे कोणता मोठा गौप्यस्फोट करणार का? हे पाहावे लागणार आहे. पुण्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामुळे पार्थ पवार यांच्यावर आरोपांची राळ उठविण्यात आल्यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे. पण असे असले तरी २१ कोटी रुपये मुद्रांक शुल्क भरल्याशिवाय पार्थ पवारांची वादग्रस्त जमीन व्यवहारातून सुटका होणार नाही. व्यवहार रद्द करण्यासाठी पार्थ पवारांच्या अमेडिया कंपनीला २१ कोटींचा मुद्रांक शुल्क भरावा लागेल अशी अट सह दुय्यम निबंधकांनी घातली असल्याची माहिती आहे. प्रकरण काय? पुण्यातील कोरगाव पार्कजवळ असलेली ४० एकर महार वतनाची जमीन ज्या जमीनीचा व्यवहार करता येत नाही. अशा जमीनीचा व्यवहार करण्यात आला. या प्रकरणात पार्थ पवार संचालक असलेल्या अमेडीया कंपनीचे नाव समोर आले. १८०४ कोटी रुपयांचे बाजारभाव असलेली जमीन केवळ ३०० रुपये देऊन खरेदी करण्यात आली असल्याचा आरोप आहे. धक्कादायक म्हणजे या व्यवहारासाठी केवळ ५०० रुपये स्टॅप ड्युडी भरण्यात आले आहे. हेही वाचा : “कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची”; शेतकरी कर्जमाफीबाबत विखे पाटलांचं विधान