RCB vs CSK : ६, ६, ४, ७….रोमारियो शेफर्डने केला कहर! खलीलच्या एकाच षटकात कुठल्या तब्बल ‘इतक्या’ धावा

Romario Shepherd’s Explosive 33 Run Over Against CSK in IPL 2025 : आयपीएल २०२५ च्या ५२ व्या सामन्यात सीएसकेविरुद्ध आरसीबीच्या रोमारियो शेफर्डने कहर केला. रोमारियो शेफर्डने स्फोटक खेळी खेळत खलील अहमदच्या एका षटकात ३३ धावा कुठल्या. या हंगामात कोणत्याही गोलंदाजाने टाकलेले हे सर्वात महागडे षटक ठरले आहे. खलील अहमदने चेन्नई सुपरकिंग्जकडून डावातील १९ वे षटक टाकले. या षटकात शेफर्डने आरसीबीसाठी चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला.
शेफर्डने खलीलच्या षटकात पाडला धावांचा पाऊस –
खलील अहमदवच्या षटकात रोमारियो शेफर्डने षटकार मारून सुरुवात केली. पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यानंतर शेफर्डने दुसऱ्या चेंडूवरही तेच केले. तिसऱ्या चेंडूवर शेफर्डने चौकार मारून खलील आणि संपूर्ण सीएसके संघाची वाईट अवस्था केली. दोन षटकार आणि एक चौकार मारल्यानंतर, खलील पुनरागमन करेल असे वाटत होते, पण त्याने पुन्हा चौथ्या चेंडूवर षटकार मारला. पाचव्या चेंडूला नो बॉल घोषित करण्यात आल्यावर खलीलची प्रकृती आणखी बिकट झाली. या चेंडूवरही शेफर्डने षटकार मारला.
खलीलच्या षटकात कुठल्या तब्बल ३३ धावा –
𝙍𝙤𝙢𝙖𝙧𝙞𝙤 𝙍𝙖𝙢𝙥𝙖𝙜𝙚 🔥
Most runs in a single over this season, courtesy of the power-packed Romario Shepherd 😮💪
Watch the video here: https://t.co/GvsbUiBPdx#TATAIPL | #RCBvCSK | @RCBTweets pic.twitter.com/MGCcIpRlIi
— IndianPremierLeague (@IPL) May 3, 2025
दिलासा देणारी गोष्ट अशी होती की खलील कसा तरी फ्री हिटपासून स्वतःला वाचवण्यात यशस्वी झाला, परंतु त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. षटकाच्या शेवटच्या चेंडूवर शेफर्डने पुन्हा चौकार मारला. अशाप्रकारे खलीलच्या या षटकातून शेफर्डने एकूण ३३ धावा कुटल्या. रोमारियो शेफर्डने केलेल्या धुलाईमुळे खलील अहमदने एक नकोस विक्रम नोंदवला आहे. खलील आयपीएलमध्ये सीएसकेचा सर्वात महागडा गोलंदाज बनला आहे. याआधी, एका षटकात सर्वाधिक धावा देणाऱ्या सीएसकेच्या यादीत लुंगी एनगिडीचे नाव होते. २०२० मध्ये एनगिडीने एका षटकात ३० धावा दिल्या होत्या.
हेही वाचा – RCB vs CSK : विराट कोहली ठरला नवा सिक्सर किंग! रोहित-गेलला जे जमलं नाही ते करुन दाखवलं
शेफर्डने अवघ्या १४ चेंडूत ठोकले अर्धशतक –
Romario Shepherd Has Now Holds The Record Of Fastest Fifty For RCB In IPL History & 2nd Fastest In IPL.#RomarioShepherd #IPL #TATAIPL #CSKvsRCB #RCBvsCSK #IPLonJioStar #ipl25 pic.twitter.com/M834ff0AmB
— Aman Singh (@amansingh25710) May 3, 2025
रोमारियो शेफर्डने या वादळी खेळीच्या जोरावर इतिहास रचला आहे. तो आयपीएल इतिहासात सर्वात वेगवान अर्धशतक झळकावणारा दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने १४ चेंडूचा सामना करताना ४ चौकार ६ षटकाराच्या मदतीने ५३ धावांचा पाऊस पाडला. यासह शेफर्ड आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक करणारा संयुक्त खेळाडूही बनला. या बाबतीत त्याने पॅट कमिन्स आणि केएल राहुलची बरोबरी केली. आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकण्याचा विक्रम यशस्वी जयस्वालच्या नावावर आहे. यशस्वीने १३ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.





