Khaleel Ahmad Injury : सीएसकेला मोठा धक्का! स्टार खेळाडू IPL 2026 मधून पडला बाहेर, नेमकं कारण काय? जाणून घ्या
Khaleel Ahmad Injury : वैद्यकीय तपासणीनंतर सीएसकेच्या स्टार खेळाडूला 'ग्रेड २ क्वाड्रिसेप्स इंजरी' (Quadriceps Injury) झाल्याचे निदान झाले आहे.

Khaleel Ahmad Injury IPL 2026 : आयपीएल २०२६ च्या हंगामात आधीच खराब फॉर्मचा सामना करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्स (CSK) समोर आता दुखापतींचे मोठे संकट उभे राहिले आहे. संघाचा मुख्य वेगवान गोलंदाज खलील अहमद गंभीर दुखापतीमुळे संपूर्ण स्पर्धेतून बाहेर पडला असून, यामुळे ऋतुराज गायकवाडच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. Khaleel Ahmad Injury
आयपीएल २०२६ मध्ये विजयासाठी संघर्ष करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा वेगवान गोलंदाज खलील अहमद आता उर्वरित सामन्यांमध्ये खेळू शकणार नाही. १४ एप्रिल रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध झालेल्या सामन्यात गोलंदाजी करताना खलीलच्या उजव्या खुब्यात तीव्र वेदना जाणवू लागल्या होत्या. वैद्यकीय तपासणीनंतर त्याला ‘ग्रेड २ क्वाड्रिसेप्स इंजरी’ (Quadriceps Injury) झाल्याचे निदान झाले आहे. ( Khaleel Ahmad Injury)
१० ते १२ आठवडे मैदानाबाहेर – (Khaleel Ahmad Injury)
KHALEEL AHMED RULED OUT OF THE IPL. ❌
– Khaleel is out of IPL 2026 due to an injury. (Bharat Sharma/PTI). pic.twitter.com/8McSZHqsez
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 16, 2026
मिळालेल्या माहितीनुसार, खलील अहमदची ही दुखापत गंभीर स्वरूपाची असून त्याला सावरण्यासाठी किमान १० ते १२ आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. याचाच अर्थ तो केवळ आयपीएलच नव्हे, तर आगामी काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटलाही मुकणार आहे. खलीलने भारतासाठी ११ वनडे आणि १८ टी-२० सामने खेळले असून, तो सीएसकेच्या गोलंदाजीचा महत्त्वाचा भाग होता. सुरुवातीच्या तीन सामन्यांत त्याला यश मिळाले नव्हते, मात्र नंतरच्या दोन सामन्यांत त्याने विकेट्स घेत आपली लय शोधली होती. Khaleel Ahmad Injury
हेही वाचा – R Vaishali : आर वैशालीने रचला इतिहास; ठरली पहिली भारतीय महिला बुद्धिबळ खेळाडू
गुणतालिकेत चेन्नईची स्थान –
चेन्नई सुपर किंग्ससाठी यंदाचा हंगाम आतापर्यंत निराशाजनक ठरला आहे. पाच सामन्यांपैकी केवळ दोन विजय मिळवून संघ अंकतालिकेत आठव्या क्रमांकावर फेकला गेला आहे. अशा स्थितीत खलीलसारख्या अनुभवी गोलंदाजाचे बाहेर जाणे चेन्नईला महागात पडू शकते. चेन्नईचा पुढील सामना १८ एप्रिल रोजी हैदराबादमध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. अद्याप खलीलच्या बदली खेळाडूची (Replacement) घोषणा करण्यात आलेली नाही, त्यामुळे या जागेवर कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





