Rohit Sharma : मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला रोहित, तरीही चाहत्याला पाहताच केलं असं काही की…VIDEO होतोय व्हायरल

Rohit Sharma stuck in Mumbai traffic : भारतीय वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा आयपीएल २०२५ मध्ये शेवटचा क्रिकेट खेळताना दिसला होता. त्यानंतर तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मात्र, तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्त्व करताना दिसणार आहे. सध्या तो खेळत नसला, तरी सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. आता त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये तो आपली नवीन लॅम्बॉर्गिनी उरूस एसई कार चावताना दिसत आहे, ज्याचा व्हिडीओ एका चाहत्याने शेअर केला आहे.
रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल –
ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेपूर्वी हिटमॅन क्रिकेटमधून मिळालेल्या सुट्टीचा आनंद घेत आहे. काही दिवसांपूर्वी तो लंडनमध्ये होता आणि तिथे तो भारताचा इंग्लंडविरुद्धचा पाचवा कसोटी सामना पाहायला गेला होता. आता तो मुंबईत परतला असून आपली नवीन कार चालवताना दिसला. पण, मुंबईच्या वाहतूक कोंडीत तो अडकला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, त्यामुळे रोहितलाही कार थांबवावी लागली. यावेळी त्याच्या बाजूच्या कारमध्ये असलेल्या एका चाहत्याला व्हिडीओ काढताना पाहिले आणि त्याला थम्सअप केले. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
Rohit Sharma got stuck in Mumbai traffic in his new Lamborghini, but he still didn’t forget to wave to his fans while heading home after finishing training.❤️
The man with golden heart @ImRo45 🐐 pic.twitter.com/ioJvh93h7b
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) August 22, 2025
रोहितच्या कारची किती आहे किंमत?
रोहित शर्माने अलीकडेच आपली जुनी लॅम्बॉर्गिनी उरुस बदलून एक नवीन, खास अपडेटेड लॅम्बॉर्गिनी उरुस एसई खरेदी केली आहे. या आलिशान परफॉर्मन्स एसयूव्हीची एक्स-शोरूम किंमत 4.57 कोटी रुपये आहे. लाल रंगाची ही एसयूव्ही खास नंबर प्लेट 3015 ने सुशोभित आहे, ज्याचा रोहितच्या कुटुंब आणि क्रिकेट कारकिर्दीशी विशेष संबंध आहे. यापूर्वी त्याच्या गाडीवर 264 हा नंबर होता, जो त्याने श्रीलंके विरुद्ध वनडेमध्ये केलेल्या 264 धावांच्या सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्येचे प्रतीक होता. आता असलेला ३०१५ नंबर हा त्याच्या मुलांची जन्मतारीख आहे
रोहित शर्माचे वनडे क्रिकेटमधील पुनरागमन –
रोहित शर्माने कसोटी आणि टी-20 आंतरराष्ट्रीय फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. 2024 मध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून, तर इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. आता रोहित केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल. ऑक्टोबर 2025 मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत रोहित शर्मा खेळण्याची शक्यता आहे.





