Virat Kohli : ‘…तोपर्यंत सिंहासारखा खेळेन, नाहीतर क्रिकेट सोडेन!’, RCBच्या खेळाडूचा विराटच्या निवृत्तीबद्दल मोठा खुलासा

विराट कोहली कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात –
‘किंग कोहली’ सध्या त्याच्या कारकीर्दीच्या अंतिम टप्प्यात आहे. कदाचित 2027 चा वनडे विश्वचषक हा त्याचा शेवटचा विश्वचषक असेल, त्यानंतर तो वनडे फॉर्मेटमधूनही निवृत्ती घेऊ शकतो. दरम्यान, कोहलीचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा सहकारी स्वास्तिक चिकाराने कोहलीच्या निवृत्तीबाबत मोठा खुलासा केला आहे.
स्वास्तिक चिकारा विराटच्या निवृत्तीबद्दल काय म्हणाला?
उत्तर प्रदेशचा 20 वर्षीय युवा फलंदाज स्वास्तिक चिकाराने विराट कोहलीसोबत झालेल्या संभाषणाचा खुलासा केला. रेव्हस्पोर्ट्सशी बोलताना तो म्हणाला, “विराट भैया म्हणाले, ‘मी जोपर्यंत खेळेन, तोपर्यंत पूर्ण तंदुरुस्त राहीन. मी इम्पॅक्ट प्लेअरसारखा खेळणार नाही. मी सिंहासारखा खेळेन. मी पूर्ण 20 षटके क्षेत्ररक्षण करेन आणि मग फलंदाजी करेन. ज्या दिवशी मला इम्पॅक्ट प्लेअरसारखे खेळावे लागेल, त्या दिवशी मी क्रिकेट सोडेन.”
विराटच्या आरसीबी संघाने प्रथमच जिंकली आयपीएल ट्रॉफी –
36 वर्षीय विराट कोहलीने आयपीएल 2025 मध्ये त्याच्या कारकीर्दीतील पहिली आयपीएल ट्रॉफी जिंकली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने अंतिम सामन्यात पंजाब किंग्जला अवघ्या 6 धावांनी पराभूत केले. कोहलीने 18 वर्षांच्या कारकीर्दीत प्रथमच आयपीएल विजेतेपद पटकावले.
हेही वाचा – Mohammad Rizwan : रिझवानचा फ्लॉप शो कायम! स्वीप शॉट मारायला गेला अन् करुन घेतली फजिती, पाहा VIDEO
विराट कोहलीची कारकीर्द –
विराट कोहलीने त्याच्या कारकीर्दीत 123 कसोटी, 302 वनडे (आतापर्यंत) आणि 125 टी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 9,230, वनडेत 14,181 आणि टी-20 मध्ये 4,188 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 82 शतके आणि 143 अर्धशतके आहेत. आयपीएलमध्ये कोहलीने 267 सामन्यांत 8,661 धावा केल्या आहेत.





