IND vs SA : विराटने शतक पूर्ण करताच रोहितचा सुटला संयम! टाळ्या वाजवताना दिली शिवी, पाहा VIDEO

Rohit Sharma Emotional and abuse after Virat Kohli century : रांची येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने आपल्या कारकिर्दीतील 52 वे शानदार शतक झळकावले. त्याने केवळ 120 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 135 धावांची स्फोटक खेळी साकारली. तब्बल नऊ महिन्यांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे हे शतक आल्याने या खेळीला विशेष महत्त्व प्राप्त झाले. या शतकानंतर विराट आणि रोहितचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
विराटच्या शतकानंत रोहित झाला ‘इमोशनल’ –
विराट कोहलीने स्वतःच्या या विक्रमी शतकाचा मनसोक्त आनंद घेतला, पण त्याहून अधिक उत्साह टीम इंडियाच्या डगआऊटमध्ये पाहायला मिळाला. विराटने आपले शतक पूर्ण करताच, पॅव्हेलियनमध्ये उभा असलेला रोहित शर्मा उत्साहाच्या भरात ‘इमोशनल’ झाला आणि त्याच्या तोंडून अपशब्द बाहेर पडले. रोहित अनेकदा आनंदाच्या भरात अशा प्रतिक्रिया देत असतो. त्याच्या उत्साहाचा हा व्हिडीीओ सोशल मीडियावर लगेच व्हायरल झाला.
Rohit celebrating Kohli’s century pic.twitter.com/x3CeWYv9yu
— Abhishek (@be_mewadi) November 30, 2025
गौतम गंभीरने मारली मिठी –
The hug moments of Virat Kohli & Gautam Gambhir in dressing room. ♥️ pic.twitter.com/Be04tt2Yq6
— Tanuj (@ImTanujSingh) November 30, 2025
दुसरीकडे, संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनीही विराट कोहलीच्या शतकाचे जोरदार स्वागत केले. विराट जेव्हा 135 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला, तेव्हा गौतम गंभीरने पुढे येऊन त्याला मिठी मारली. या दोघांचे हे सौहार्दपूर्ण वागणेही सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहे.
हेही वाचा – Virat Kohli Records : ‘थाला’च्या इलाक्यात विराटचा धमाका! शतक एक, विक्रम अनेक, पाहा संपूर्ण यादी
विराटचा आक्रमक आणि भावूक जल्लोष –
A leap of joy ❤️💯
A thoroughly entertaining innings from Virat Kohli 🍿
Updates ▶️ https://t.co/MdXtGgRkPo#TeamIndia | #INDvSA | @IDFCFIRSTBank | @imVkohli pic.twitter.com/llLByyGHe5
— BCCI (@BCCI) November 30, 2025
रोहित आणि गंभीरच्या प्रतिक्रियेनंतर, स्वतः विराट कोहलीने आपले शतक कसे साजरे केले हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. चौकार मारून शतक पूर्ण करताच कोहलीने हवेत उंच उडी मारली आणि त्याने आक्रमकपणे बॅट हवेत फिरवली. हातातील बॅट उंचावल्यानंतर, विराटने आपल्या गळ्यात घातलेल्या अंगठीला किस केला आणि दोन्ही हात जोडून देवाची प्रार्थना करत त्याने कृतज्ञता व्यक्त केली. विराटचे हे आक्रमक आणि भावूक रूप बऱ्याच काळानंतर पाहायला मिळाले.





