IND vs SA : विराटचं शानदार शतक अन् चाहत्याचा पाय धरण्याचा ड्रामा, रांचीच्या मैदानातील VIDEO व्हायरल

विराटने शतक झळकावताच चाहत्याने धरले पाय –
विराट कोहलीने 38 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारत केवळ 102 चेंडूंमध्ये आपले विक्रमी शतक पूर्ण केले. शतक झाल्यावर त्याने हवेत उडी मारून नेहमीप्रमाणे आक्रमक जल्लोष केला. मात्र, शतक पूर्ण झाल्यानंतर लगेचच एक चाहता सुरक्षा भेदून मैदानावर धावत आला आणि तो थेट कोहलीजवळ पोहोचला. या चाहत्याने तात्काळ खाली वाकून कोहलीचे पाय धरले. यामुळे मैदानावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, सुरक्षा रक्षकांनी त्वरीत धाव घेत त्या चाहत्याला पकडले आणि मैदानाबाहेर काढले.
He is the reason for my happiness @imVkohli
83rd Century for Virat Kohli 🙌#INDVSSAODI pic.twitter.com/0i7HJKBsOP— Reyansh (@Reyansh34449) November 30, 2025
मैदानात चाहता घुसण्याची ही पहिली वेळ नाही –
I BOW DOWN TO YOU VIRAT KOHLI. YOU ARE THE GREATEST EVER ♥️ pic.twitter.com/9yTTrbJdWt
— ` (@chixxsays) November 30, 2025
एखाद्या चाहत्याने मैदानात घुसून विराट कोहलीला भेटण्याचा प्रयत्न करण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी आयपीएल सामन्यांदरम्यानही असे प्रसंग घडले आहेत, जेव्हा चाहते थेट क्रीजपर्यंत पोहोचले होते. विराट कोहलीसोबतच रोहित शर्मा, महेंद्र सिंह धोनी आणि सचिन तेंडुलकर यांच्यासारख्या अनेक मोठ्या खेळाडूंना भेटण्यासाठी चाहत्यांनी मैदानात घुसखोरी केल्याची अनेक उदाहरणे भारतात पाहायला मिळाली आहेत.
हेही वाचा – IND vs SA : विराटने शतक पूर्ण करताच रोहितचा सुटला संयम! टाळ्या वाजवताना दिली शिवी, पाहा VIDEO
कोहली-रोहितची जबरदस्त फलंदाजी –
रांचीतील या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी उत्कृष्ट फलंदाजी केली. रोहित शर्माने 51 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 57 धावा केल्या, तर विराट कोहलीने 120 चेंडूंमध्ये 11 चौकार आणि 7 षटकारांसह 135 धावांची जबरदस्त खेळी केली.या दोन्ही खेळाडूंनी दुसऱ्या विकेटसाठी 136 धावांची शानदार भागीदारी करत भारताला 349 धावांचा मोठा डोंगर उभा करून दिला.





