Rohit Sharma Dance : रोहित शर्माचा ‘रापचिक’ डान्स! मुंबई इंडियन्सच्या फॅन इव्हेंटमध्ये हिटमॅनचा जलवा; डिव्हाईनच्या रॅपवर ठरला ठेका
Rohit Sharma Dance : मुंबई इंडियन्सच्या सोहळ्यात 'हिटमॅन' रोहित शर्मा याच्या एका डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Rohit Sharma Dance Video Mumbai Indians Fan Meet : आयपीएलचा १९ वा हंगाम २८ मार्चपासून सुरू होत असून, सर्व १० संघांनी तयारी पूर्ण केली आहे. दरम्यान, पाचवेळा विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्स (MI) संघाने २१ मार्चच्या संध्याकाळी चाहत्यांसाठी एका भव्य ‘फॅन मीट’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या सोहळ्यात ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्या एका डान्स व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
मुंबई इंडियन्सने या खास कार्यक्रमाचे आयोजन आपल्या चाहत्यांशी संवाद साधण्यासाठी केले होते. या इव्हेंटमध्ये मुंबई इंडियन्सचे सर्वच स्टार खेळाडू उपस्थित होते. मात्र, खरी महफिल लुटली ती रोहित शर्माने. आपल्या कुटुंबासह या सोहळ्यात पोहोचलेल्या रोहितचा एक डान्स करतानाचा व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल होत असून, त्याने चाहत्यांची मने जिंकली आहेत.
गाणं वाजलं अन् रोहित थिरकला!
या कार्यक्रमात प्रसिद्ध रॅपर डिव्हाईन (Divine) याने सादरीकरण केले. डिव्हाईनने त्याचे लोकप्रिय गाणे ‘एक खोका, दोन खोका…’ गाण्यास सुरुवात करताच रोहित शर्मा स्वतःला रोखू शकला नाही. यावेळी रोहितच्या कडेवर त्याची मुलगी समायरा होती. गाणे सुरु होताच रोहितने तातडीने समायराला शेजारी उभा असलेल्या तिलक वर्मा याच्याकडे सोपवले आणि स्वतः डान्स स्टेप्स करत गाण्याचा आनंद लुटला. रोहितच्या या बिनधास्त अंदाजाचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरला आहे.
रोहितच्या फॉर्मकडे सर्वांचे लक्ष –
गेल्या आयपीएल हंगामात रोहित शर्माचा फॉर्म चढ-उताराचा राहिला होता, जिथे तो अनेक सामन्यांमध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून खेळताना दिसला होता. मुंबई इंडियन्सला सहाव्यांदा करंडक जिंकायचा असेल, तर रोहितची बॅट तळपणे अत्यंत आवश्यक आहे. मुंबई इंडियन्स आपल्या मोहिमेची सुरुवात २९ मार्च रोजी कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध वानखेडे स्टेडियमवर करणार आहे. गेल्या वर्षी दुसऱ्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सकडून पराभूत झाल्यामुळे मुंबईचे स्वप्न भंगले होते, ते यंदा पूर्ण करण्यासाठी संघ सज्ज आहे.





