Zeeshan Ansari Gesture : SRH च्या सराव सामन्यात तुफान राडा! विकेट घेतल्यानंतर युवा गोलंदाज कर्णधार इशानवर संतापला, पाहा VIDEO
Zeeshan Ansari Gesture : नवनियुक्त प्रभारी कर्णधार इशान किशन आणि युवा फिरकीपटू झीशान अंसारी यांच्यातील वादाचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.

Ishan Kishan Zeeshan Ansari SRH Practice Match Row Video Viral : पॅट कमिन्सच्या अनुपस्थितीत यंदा आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांसाठी सनरायझर्स हैदराबादने इशान किशनकडे नेतृत्वाची धुरा सोपवली आहे. २१ मार्च रोजी झालेल्या सराव सामन्यात इशानने आपल्या फलंदाजीने प्रतिस्पर्धी गोलंदाजांची पळता भुई थोडी केली. त्याने अवघ्या २४ चेंडूत ७२ धावांची वादळी खेळी केली. मात्र, ज्या पद्धतीने तो बाद झाला आणि त्यानंतर जे घडलं, त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
नेमकं काय घडलं?
हा सराव सामना सनरायझर्स हैदराबादच्या ए आणि बी संघात खेळला गेला. या सामन्याच्या दुसऱ्या डावात आठवे षटक फिरकीपटू झाशान अंसारी टाकत होता. इशानने झीशानच्या पहिल्या ४ चेंडूंवर २ चौकार आणि २ षटकार ठोकत २० धावा कुटल्या. पाचव्या चेंडूवरही इशानने मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, पण तो डीप स्क्वेअर लेगला झेलबाद झाला. विकेट मिळाल्यानंतर झीशान अंसारी प्रचंड संतापलेला दिसला. त्याने बाद झालेल्या इशान किशनच्या दिशेने धावत जाऊन बोटाने पॅव्हेलियनकडे जाण्याचा इशारा केला आणि आक्रमकपणे ‘सेंडऑफ’ दिला.
इशानची संयमी भूमिका –
Send off to Ishan Kishan 🤯
During the intra squad match today, Zeeshan Ansari, a bowler for Sunrisers Hyderabad, was seen giving a send off to his own captain Ishan Kishan after dismissing him.
The team atmosphere doesn’t seem to be very good.
— Stubbsy (@spideypant_) March 21, 2026
आपल्याच संघातील ज्युनियर खेळाडूचे हे वर्तन पाहून मैदानावरील सर्वच खेळाडू थक्क झाले. यष्टीरक्षकाने झीशानला रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा राग शांत होत नव्हता. या संपूर्ण प्रकारावर कर्णधार इशान किशनने कोणतीही प्रतिक्रिया न देता केवळ हसून हा विषय टाळला आणि तो शांतपणे मैदानाबाहेर निघून गेला.
धावांचा पाऊस आणि सज्जता –
या सराव सामन्यात फलंदाजांचे वर्चस्व राहिले. अभिषेक शर्माने ९४ धावांची खेळी केली, तर हेनरिक क्लासेनने ४९ आणि सलिल अरोरा याने १६ चेंडूत ४७ धावा कुटल्या. ट्रॅव्हिस हेड अद्याप संघात सामील व्हायचा आहे, पण त्याआधीच हैदराबादच्या फलंदाजांनी आयपीएल २०२६ मध्ये आपला दरारा निर्माण केला आहे.





