Virat Rohit Partnership : ‘रो-को’चा कार्डिफमध्ये विराट पराक्रम! सचिन तेंडुलकर आणि गांगुलीच्या ‘त्या’ खास क्लबमध्ये मारली थेट एन्ट्री
Virat Rohit Partnership : विराट कोहली आणि रोहित शर्माने दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केल्याने या दोन्ही दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अभूतपूर्व इतिहास रचला.

Virat Kohli Rohit Sharma 8000 Partnership Runs Milestone IND vs ENG 2nd ODI : भारत आणि इंग्लंड यांच्यातील वनडे मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारतीय चाहत्यांना विराट-रोहितकडून मोठ्या खेळीची प्रतीक्षा होती. एजबेस्टन येथील पहिल्या सामन्यात दोघांनी निराश केल्यानंतर दुसऱ्या सामन्यात त्यांच्याकडून मोठ्या पुनरागमनची अपेक्षा होती. मात्र, ‘हिटमॅन’ रोहित शर्मा पुन्हा एकदा मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरला आणि वैयक्तिक २६ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. परंतु त्याने त्याने विराट कोहलीसोबत दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केल्याने या दोन्ही दिग्गजांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक अभूतपूर्व इतिहास रचला.
रोहित-विराटच्या भागीदारीचा ‘८ हजारी’ टप्पा –
रोहित शर्मा आणि विराट कोहली या जोडीने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (कसोटी, वनडे आणि टी-२०) एकत्रित फलंदाजी करताना ८,००० भागीदारी धावांचा टप्पा ओलांडला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात हा पराक्रम करणारी ही केवळ तिसरीच भारतीय जोडी ठरली आहे. या ऐतिहासिक भागीदारीमुळे रोहित-विराटने जागतिक क्रिकेटमध्ये आपला दबदबा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.
सचिन-गांगुली अजूनही अव्वल स्थानी –
ROHIT SHARMA – VIRAT KOHLI PAIR COMPLETED 8000 RUNS IN INTERNATIONAL CRICKET 🔥
– The Ultimate duo in Modern Era. pic.twitter.com/5mXWGuyqKy
— Johns. (@CricCrazyJohns) July 16, 2026
भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये मिळून सर्वाधिक धावांची भागीदारी करण्याचा विश्वविक्रम महान फलंदाज सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. या जोडीने एकत्रितपणे १२,००० पेक्षा जास्त धावांची भागीदारी केली आहे. या यादीत दुसऱ्या स्थानावर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांची जोडी असून त्यांनी ११,००० हून अधिक धावा जोडल्या आहेत.
तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावांची भागीदारी करणाऱ्या टॉप ५ भारतीय जोड्या:
- १२,४०० धावा – सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली
- ११,०३७ धावा – सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड
- ८,००८ धावा – रोहित शर्मा आणि विराट कोहली *
- ७,६२६ धावा – सौरव गांगुली आणि राहुल द्रविड
- ७,१९९ धावा – वीरेंद्र सहवाग आणि गौतम गंभीर
सध्याच्या भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू असलेल्या रोहित आणि विराटच्या या नव्या विक्रमामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. रोहित २६ धावांवर बाद झाला असला, तरी या जोडीने भारताच्या डावाला चांगली गती दिली. रोहित बाद झाल्यानंतर विराट अर्धशतक झळकावल्यानंतर ६५ (६६) धावांवर बाद झाला.





