Mitchell Starc Record : मिचेल स्टार्कचा वर्ल्ड रेकॉर्ड! ‘हा’ खास पराक्रम करणारा ठरला जगातील पहिलाच डावखुरा वेगवान गोलंदाज
Mitchell Starc Record : गकेबरहा येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४५० विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला.

Mitchell Starc Creates Test History by Completing 450 Wickets Against South Africa : ऑस्ट्रेलियाचा अनुभवी आणि घातक डावखुरा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याने कसोटी क्रिकेटच्या इतिहासात अजरामर कामगिरी नोंदवली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध गकेबरहा येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टार्कने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ४५० विकेट्सचा ऐतिहासिक टप्पा गाठला. या कामगिरीसह कसोटी क्रिकेटच्या संपूर्ण इतिहासात ४५० विकेट्स पूर्ण करणारा तो जगातील पहिलाच डाव्या हाताचा वेगवान गोलंदाज ठरला असून, त्याने दिग्गज खेळाडूंना मागे टाकत क्रिकेट विश्वात आपला दबदबा निर्माण केला आहे.
अवघ्या २ विकेट्सची गरज; वॉर्न आणि मॅकग्रानंतर तिसरा ऑस्ट्रेलियन –
या दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी स्टार्कला ४५० विकेट्सचा टप्पा गाठण्यासाठी केवळ दोन विकेट्सची आवश्यकता होती. आफ्रिकेविरुद्ध भेदक मारा करत दोन गडी बाद करताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर कोरला. आतापर्यंत १०९ कसोटी सामन्यांत २६ च्या प्रभावी सरासरीने गोलंदाजी करताना त्याने हा पल्ला गाठला आहे. या पराक्रमासह तो ऑस्ट्रेलियासाठी कसोटीत सर्वाधिक विकेट्स टिपणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत महान फिरकीपटू शेन वॉर्न (७०८ विकेट्स) आणि ग्लेन मॅकग्रा (५६३ विकेट्स) यांच्यानंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
सर्वात कमी चेंडूंत ४५० विकेट्स; ग्लेन मॅकग्राचा विक्रम मोडला –
Test wicket No. 450 for Mitchell Starc ⭐️ https://t.co/s3Ev2dVw6o
— Cricbuzz (@cricbuzz) October 20, 2026
या ऐतिहासिक कामगिरीदरम्यान मिचेल स्टार्कने ऑस्ट्रेलियन दिग्गज ग्लेन मॅकग्राचा एक मोठा जागतिक विक्रम मोडला. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडू टाकून ४५० विकेट्स मिळवण्याचा पराक्रम स्टार्कने केला आहे. मॅकग्राने २३ हजार ४७४ चेंडूंमध्ये हा टप्पा पार केला होता; मात्र स्टार्कने अवघ्या २० हजार ५७७ चेंडूंत ४५० वितेट्स टिपून मॅकग्राला मागे टाकले. त्याचबरोबर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणून स्वतःची मोहोर उमटवली.
१९ वेळा ५ विकेट्स; गोलंदाजीसह फलंदाजीतही चमकदार कामगिरी
WICKET NO. 450 FOR MITCHELL STARC! 🔥🐐
450 AND COUNTING. THE LEFT ARM MENACE NEVER STOPS! 🇦🇺💥 https://t.co/TuvPIPpd2o
— Honey (@stevensmithclub) October 20, 2026
कसोटी कारकिर्दीत स्टार्कचा दबदबा सातत्याने राहिला आहे. त्याने आतापर्यंत एकाच डावात १९ वेळा ५ विकेट्स तर सामन्यात ४ वेळा १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. इंग्लंडविरुद्ध ॲशेस मालिकेत ५८ धावांत ७ विकेट्स ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली आहे. केवळ चेंडूनेच नव्हे, तर तळाला फलंदाजी करताना त्याने २५०० हून अधिक उपयुक्त धावा फटकावून अनेक वेळा संघाला संकटातून तारले आहे.





