Rohit Sharma : ३८ व्या वर्षीही रोहितचा ‘हिटमॅन’ क्लास कायम, विजय हजारे ट्रॉफीत ठोकलं विस्फोटक शतक

Rohit Sharma Century in Vijay Hazare Trophy 2025 : टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज रोहित शर्माने पुन्हा एकदा आपल्या बॅटने टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. वयाच्या ३८ व्या वर्षीही आपला क्लास कायम राखत रोहितने विजय हजारे ट्रॉफी २०२५ मध्ये ऐतिहासिक शतकी खेळी साकारली. ज्यामुळे मुंबईने पहिल्याच सामन्यात सिक्कीमचा आठ विकेट्सनी पराभव केला. अशा प्रकारे रोहितने आता देशांतर्गत क्रिकेटमध्ये आपल्या आक्रमक फलंदाजीने गोलंदाजांची दाणादाण उडवली आहे.
केवळ ६२ चेंडूत ‘विस्फोटक’ शतक
रोहित शर्माने या सामन्यात सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला होता. त्याने अवघ्या ६२ चेंडूंमध्ये आपले शतक पूर्ण केले. रोहितच्या या खेळीचे वैशिष्ट्य म्हणजे त्याने आपल्या १०० धावांपैकी ८० धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या मदतीने वसूल केल्या. त्याने आपल्या खेळीत ८ उत्तुंग षटकार आणि ८ चौकार ठोकले. धावून केवळ २० धावा काढत त्याने आपल्या ‘पॉवर हिटिंग’चा नमुना पेश केला.
लिस्ट-ए क्रिकेटमध्ये ३७ वे शतक –
Shame on BCCI for not telecasting Virat Kohli and Rohit Sharma matches when they’re playing at their absolute best. Hide them from screens, keep them away from fans—but the hype won’t stop. Legends don’t need telecast to stay relevant. #ViratKohli𓃵 #viratkohli #RohitSharma… pic.twitter.com/gEXQbJCFTZ
— Akshat Dwivedi (@akshhhuuu) December 24, 2025
या शतकी खेळीसह रोहित शर्माच्या नावावर लिस्ट-ए क्रिकेटमध्ये आता ३७ शतकांची नोंद झाली आहे. या कामगिरीसह त्याने जागतिक क्रिकेटमधील दिग्गजांच्या यादीत स्थान अधिक भक्कम केले आहे. लिस्ट-ए क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम सचिन तेंडुलकर (६० शतके) यांच्या नावावर असून, विराट कोहली ५७ शतकांसह दुसऱ्या स्थानी आहे. रोहित आता या यादीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला असून, सध्याचा फॉर्म पाहता तो लवकरच पहिल्या तीनमध्ये स्थान मिळवू शकतो.
हेही वाचा – IND Vs SRI : शेफालीच्या वादळी खेळीच्या जोरावर भारताचा श्रीलंकेवर 7 गडी राखून विजय
२०२७ च्या विश्वचषकाचे दिले संकेत
टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारल्यानंतर रोहित शर्माचे पूर्ण लक्ष आता एकदिवसीय (ODI) क्रिकेटवर केंद्रित आहे. विजय हजारे ट्रॉफीमधील ही खेळी केवळ एक शतक नसून, २०२७ च्या वनडे वर्ल्ड कपसाठी त्याने दिलेला मोठा संकेत मानला जात आहे. वाढत्या वयाचा आपल्या खेळावर कोणताही परिणाम झालेला नाही, हे रोहितने मैदानावर सिद्ध करून दाखवले आहे.





