IND vs SA : लुंगी एनगिडीचा कहर! गिल-सूर्या-अभिषेक स्वस्तात माघारी, टीम इंडियाचा डाव अडचणीत

IND vs SA 1st T20I Lungi Ngidi double blow : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेची सुरुवात भारतीय संघासाठी अत्यंत निराशाजनक ठरली आहे. कटकच्या ऐतिहासिक बाराबाती स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने अवघ्या १७ धावांमध्ये आपले दोन महत्त्वाचे गडी गमावले. सलामीवीर शुबमन गिल आणि कर्णधार सूर्यकुमार यादव दोघेही एकाच पद्धतीने पॅव्हेलियनमध्ये परतले.
लुंगी एनगिडीचा टीम इंडियाला डबल धक्का –
दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने भेदक गोलंदाजी करत भारताला हे सुरुवातीचे मोठे धक्के दिले. त्याने एकाच प्रकारच्या चेंडूंवर गिल आणि सूर्यकुमार या दोन्ही फलंदाजांना बाद केले, ज्यामुळे भारतीय संघात चिंतेचे वातावरण पसरले.
Captain and Vice Captain of our T20Is team 😔 #INDvsSA pic.twitter.com/OLsF1Ti8nW
— Dr Aakriti (@draakriti01) December 9, 2025
या सुरुवातीच्या धक्क्यांमुळे टीम इंडियाची मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल थांबली असून, आता मधल्या फळीतील फलंदाजांवर डाव सावरण्याचा मोठा दबाव आहे. एनगिडीच्या या घातक स्पेलमुळे दक्षिण आफ्रिकेने सामन्यावर मजबूत पकड मिळवली आहे.
गिल, सूर्यकुमार पाठोपाठ अभिषेक शर्माही बाद –
Suryakumar Yadav in his last 24 T20I innings:
20(10), 1(4), 39*(24), 1(5), 12(13), 5(11), 0(3), 47*(37), 7*(2), 2(3), 0(4), 14(7), 12(7), 0(3), 1(4), 4(9), 21(17), 75(35), 8(10), 29(14), 8(9), 26(12), 58(26), 12(11)Shubman Gill in his last 13 T20I innings:
20(9), 10(7), 5(8),… pic.twitter.com/gbXPa3KXOv— Attraction Vibes (@attractsphere) December 9, 2025
या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात अत्यंत खराब झाली आहे. सलामीवीर शुभमन गिल फक्त ४ धावा करून बाद झाला, तर कर्णधार सूर्यकुमार यादवला केवळ १२ धावा करता आल्या. या दोन महत्त्वाच्या विकेट्सनंतर थोड्याच वेळात अभिषेक शर्माही पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने १२ चेंडूंचा सामना करत १७ धावा केल्या. अभिषेकला लुथो सिपाम्लाने झेलबाद केले.
हेही वाचा – R Ashwin : आर. अश्विनच्या पोस्टमध्ये दिसली सनी लिओनी! काय आहे व्हायरल पोस्टमागची खरी ‘भानगड’? जाणून घ्या
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन :
भारत : अभिषेक शर्मा, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग.
दक्षिण आफ्रिका : क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), एडन मार्कराम (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, डेवाल्ड ब्रेविस, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फरेरा, मार्को जॅनसेन, केशव महाराज, लुथो सिपामला, लुंगी एनगिडी, ॲनरिक नॉर्टजे.





