Rohit Pawar : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी अखेर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा रुपाली चाकणकरांना राजीनामा द्यावा लागला. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून पायउतार झालेल्या रूपाली चाकणकर यांचा राजीनामा पुढील कार्यवाहीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिली आहे. दरम्यान, रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राज्य महिला आयोगाच्या महत्त्वाच्या पदावर कोणाची वर्णी लागणार? याची नावे चर्चेत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी काही नावे सुचवली आहेत. Sunetra Pawar : रोहित पवार यांनी चाकणकर यांच्या कार्यकाळातील ‘चमकोगिरी’वर सडकून टीका केली. पोस्टमध्ये रोहित पवार यांनी लिहिले की, “राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावर चमकोगिरी करणाऱ्यापेक्षा निवृत्त IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांच्यासारख्या निष्पक्ष, निर्भिड आणि कायद्याचं सखोल ज्ञान असलेल्या किंवा ॲड. वर्षा देशपांडे यांच्यासारख्या सामाजिक क्षेत्रात मोठं काम असलेल्या किंवा ‘मासूम’च्या मनिषा गुप्ते किंवा निवृत्त IAS अधिकारी मेधा गाडगीळ यांची किंवा यांच्यासारख्या इतर योग्य अराजकीय व्यक्तींची नेमणूक करणं गरजेचं आहे. तरच राज्यातील पिडीत महिलांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल आणि एखाद्या वाईटातूनही चांगलं घडल्याचं समाधान मिळेल..! हा निर्णय सर्वस्वी मा. सुनेत्राकाकींना घ्यायचाय आणि त्या योग्य निर्णय घेतील, ही अपेक्षा,” असे सांगत रोहित पवार यांनी एक प्रकारे या प्रक्रियेत कोणीही ढवळाढवळ करू नये, असा सूचक इशारा दिला आहे. Rohit Pawar हेही वाचा: Jhimma 3 Film : हेमंत ढोमेचे चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर