Jhimma 3 Film : हेमंत ढोमेचे चाहत्यांना सरप्राइज; नव्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
Jhimma 3 Film: पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर एका समुद्रकिनारी डोक्याला हात लावून उभा असलेला पाहायला मिळत आहे.

Jhimma 3 Film : ‘क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम’ चित्रपटाच्या यशानंतर हेमंत ढोमे ‘झिम्मा’चा तिसरा भाग घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 21 मार्च रोजी त्याच्या वाढदिवसानिमित्त हेमंतने झिम्मा ३’ चित्रपटाचे पोस्टर शेअर करत त्याने रिलीज डेटही जाहीर केली आहे.
या पोस्टरमध्ये चित्रपटाचा अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसत आहे. एका नवीन लोकेशन सोबत सिद्धार्थ ट्रिप प्लान करणार आहे. पोस्टरमध्ये सिद्धार्थ चांदेकर एका समुद्रकिनारी डोक्याला हात लावून उभा असलेला पाहायला मिळत आहे. तर त्याच्या आजूबाजूला बॅग्स दिसत आहेत.
View this post on Instagram
‘झिम्मा ३’च्या नवीन पोस्टरला खास कॅप्शन देत लिहिलं की, “आपला आनंदाचा खेळ ‘यावेळी तिसराच आहे’! झिम्मा ३” चित्रपटाच्या या पोस्टवर चाहत्यांसह कलाकार मंडळीकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
‘झिम्मा ३’ चित्रपट 1 जानेवारी 2027 ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. नवीन वर्षात पुन्हा एकदा झिम्माचा खेळ रंगणार आहे. ‘झिम्मा ३’ चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमे यांचे आहे. तर निर्मिती क्षिती जोगची आहे.
‘झिम्मा’ फ्रेंचायझीचा हा तिसरा भाग असून ‘झिम्मा’ 2021 ला थिएटरमध्ये रिलीज झाला होता आणि ‘झिम्मा 2’ चित्रपट 2023 ला प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. आता ‘झिम्मा 3’ चित्रपटाकडूनही चाहत्यांना मोठी अपेक्षा आहे.
हेही वाचा:
Mulshi Water : पुणेकरांना आता मुबलक पाणी? मुळशीचे पाणी देण्यास सरकार अनुकूल





