Rohit Pawar : अजितदादांना हे आवडलं असतं का? रोहित पवारांचा थेट सवाल; पोस्ट चर्चेत
Rohit Pawar : या संदर्भात त्यांनी बँक कर्मचारी आणि पदवीधर मतदार यांच्यातील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर शेअर केली आहे.

Rohit Pawar : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC) इंदापूर तालुक्यातील भवानीनगर शाखेतून भाजपच्या उमेदवारांना मतदान करण्याचे आवाहन केले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.
या संदर्भात त्यांनी बँक कर्मचारी आणि पदवीधर मतदार यांच्यातील संभाषणाची कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर शेअर केली आहे. संबंधित अॅाडिओ क्लिपची आम्ही पुष्टी करत नाही. (Rohit Pawar)
यानंतर मोठी खळबळ उडाली असून, या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, आमदार रोहित पवार यांनीही या प्रकरणावरून सोशल मीडियावर पोस्ट करत मोठा दावा केला आहे. (Rohit Pawar)
राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पुणे जिल्ह्यातील एका नेत्याने आपल्या खांद्यावर भाजपाची पालखी घेतलीय की काय, असं दिसतंय.
एकतर पुणे विभाग पदवीधरची हक्काची जागा भाजपाने त्यांच्याकडून हिसकावून घेतली आणि आता त्यांच्या प्रचारालाही राष्ट्रवादीलाच जुंपलंय. राष्ट्रवादी अजितदादा गटाने पीडीसीसी बँक भाजपाविरोधात लढली, पण आता त्याच बँकेतील कर्मचारी राष्ट्रवादीच्या या नेत्याच्या मार्गदर्शनाखाली भाजपाच्या प्रचारासाठी कामाला लावले आहेत. त्यासाठी या नेत्याने दोन दिवसांपूर्वी कुणालाही विश्वासात न घेता पीडीसीसी बँकेत बैठक घेतली आणि तिथं भाजपाच्या पुणे शहरातील एका पदाधिकाऱ्याला भाषण ठोकायला सांगून अख्खी बँक भाजपाच्या पुणे विभाग शिक्षक आणि पदवीधर उमेदवाराच्या प्रचाराला जुंपली. पण बँकेचा आणि विधानपरिषदेच्या पदवीधर-शिक्षक निवडणुकीचा संबंध काय?
ज्या राष्ट्रवादीने झेडपी, जिल्हा बँक आणि आता राज्यात काम करण्याची संधी या नेत्याला दिली, त्याच नेत्याकडून आता स्वार्थासाठी भाजपाकडे ‘पाणी भरणे’ सुरू केले आहे. अजितदादा जिथून कुठून हे पाहत असतील, तर ते काय विचार करत असतील आणि त्यांना हे आवडलं असतं का? हीच का या नेत्याची निष्ठा?
उद्या हा नेता राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडून कुठल्या पक्षातून लढण्याची तयारी करतोय, याचाच अंदाज यातून येतो. त्यासाठीच भाजपाच्या वरिष्ठ नेत्याला खूश करण्यासाठी बँकेचा वापर केला जातोय, पण हे योग्य नाही. माझं बँकेतील कर्मचाऱ्यांनाही आवाहन आहे की, या नेत्याचे बेकायदा आदेश पाळून भाजपाचा प्रचार करणं बंद करा. शेतकऱ्यांना सेवा देणं हे तुमचं काम आहे आणि तेच योग्य प्रकारे करा. नको त्या फंदात पडून चुकीचं काम केलं, तर आमचंही तुमच्याकडे बारकाईने लक्ष आहे, हे विसरू नका!
#पुणे_पदवीधर_मतदारसंघ #पुणे_शिक्षक_मतदारसंघ #PDCCBank #राजकीय_निष्ठा
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 22, 2026
रोहित पवारांची पोस्ट; अजित पवार गटातील नेत्याविषयी मोठा दावा (Rohit Pawar)
या प्रकरणानंतर आमदार रोहित पवार यांनी ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. राष्ट्रवादी अजितदादा गटाच्या पुणे जिल्ह्यातील एका नेत्याने आपल्या खांद्यावर भाजपाची पालखी घेतलीय की काय, असं दिसतंय असे म्हणत ज्या राष्ट्रवादीने झेडपी, जिल्हा बँक आणि आता राज्यात काम करण्याची संधी या नेत्याला दिली, त्याच नेत्याकडून आता स्वार्थासाठी भाजपाकडे ‘पाणी भरणे’ सुरू केले आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र, पोस्टमध्ये त्यांनी ज्या नेत्यावर आरोप केला आहे त्यांचे नाव घेतलेले नाही. त्यामुळे या नेत्याविषयी चर्चांना उधाण आले आहे.
अजितदादा जिथून कुठून हे पाहत असतील, तर ते काय विचार करत असतील आणि त्यांना हे आवडलं असतं का? हीच का या नेत्याची निष्ठा? असे सवालही रोहित पवारांनी उपस्थित केले आहेत. पोस्टमध्ये रोहित पवार म्हणतात ‘माझं बँकेतील कर्मचाऱ्यांनाही आवाहन आहे की, या नेत्याचे बेकायदा आदेश पाळून भाजपाचा प्रचार करणं बंद करा. शेतकऱ्यांना सेवा देणं हे तुमचं काम आहे आणि तेच योग्य प्रकारे करा. नको त्या फंदात पडून चुकीचं काम केलं, तर आमचंही तुमच्याकडे बारकाईने लक्ष आहे, हे विसरू नका!’





