गुजरात विधानसभा आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर आले आहेत. यामध्ये गुजरातच्या १८२ जागांपैकी १२४ ठिकाणी भाजपने विजय मिळवला आहे, तर ३२ ठिकाणी भाजप अजूनही आघाडीवर आहे. त्याचबरोबर काँग्रेसला या निवडणुकीत मोठे अपयश आलेले आहे. त्यांनी आत्तापर्यंत ११ जागांवर विजय मिळवलाय, तर ६ ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहेत. या निवडणुकीत मोठ्या ताकदीने उतरलेल्या ‘आप’ला मात्र ४ जागांवर विजय मिळवता आलाय. दरम्यान, गुजरातमधील भाजपच्या विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
“गुजरातेत भाजपाच्या ऐतिहासिक विजयामागे मोदींचं व्हिजन…” चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी ट्विट केले आहे की,”महाराष्ट्राच्या युवांच्या नोकरीच्या स्वप्नांना चुरगळून तेच स्वप्न गुजरातच्या युवांना दाखवत स्वतःचं सत्तेचं स्वप्न साकारणाऱ्या भाजपाचं ‘हार्दिक’ अभिनंदन, तर हिमाचल प्रदेश आणि दिल्ली महानगरपालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला नमवत विजयी झालेल्या काँग्रेस आणि आपचंही मनःपूर्वक अभिनंदन.”
“गुजरातेत भाजपाच्या ऐतिहासिक विजयामागे मोदींचं व्हिजन…” चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य
“गुजरातचा निकाल म्हणजे PM साहेबांच्या ३१ व गृहमंत्र्यांच्या ३८सभा तर डझनभर केंद्रीयमंत्री व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकून केलेल्या प्रचाराचं फलित आहे. शिवाय मोठ्या मनाने स्वतःचे प्रकल्प गुजरातला देऊन शेजारधर्म निभावणाऱ्या महाराष्ट्र शासनाचंही योगदान विसरता येणार नाही.” अशा शब्दांत रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
गुजरातचा निकाल म्हणजे PM साहेबांच्या ३१ व गृहमंत्र्यांच्या ३८सभा तर डझनभर केंद्रीयमंत्री व अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तळ ठोकून केलेल्या प्रचाराचं फलित आहे. शिवाय मोठ्या मनाने स्वतःचे प्रकल्प गुजरातला देऊन शेजारधर्म निभावणाऱ्या महाराष्ट्र शासनाचंही योगदान विसरता येणार नाही.
— Rohit Pawar (@RRPSpeaks) December 8, 2022
त्याचबरोबर, हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसने सत्ताधारी भाजपला सत्तेवरून खाली खेचले आहे. याठिकाणी असलेल्या ६८ जागांपैकी ३८ ठिकाणी काँग्रेसने विजय मिळवलाय, तर २ ठिकाणी त्यांचे उमेदवार आघाडीवर आहे. त्याचवेळी भाजपने १८ ठिकाणी विजय मिळवलाय, तर ७ ठिकाणी ते आघाडीवर आहेत. याव्यतिरिक्त इतर ३ उमेदवारांचा हिमाचलमध्ये विजय झाला आहे.