BCCI : बीसीसीआय अध्यक्ष रॉजर बिन्नी यांचा राजीनामा, हंगामी प्रमुख कोण? जाणून घ्या

नवीन प्रायोजक शोधण्यावर झाली चर्चा –
दैनिक जागरणच्या सूत्र आधारित वृत्तानुसार, बुधवारी बीसीसीआयच्या शिखर परिषदेची बैठक झाली, ज्याचे अध्यक्षस्थान राजीव शुक्ला यांनी भूषवले. या बैठकीत प्रायोजकत्व हा मुख्य मुद्दा होता. यात ड्रीम11 सोबतचा करार संपुष्टात आला असून, पुढील दोन ते अडीच वर्षांसाठी नवीन प्रायोजक शोधण्यावर चर्चा झाली.
अहवालानुसार, आशिया चषकाला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक असल्याने तात्पुरता प्रायोजक मिळणे कठीण आहे. सूत्रांनी सांगितले की, नवीन निविदा काढणे, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आणि इतर तांत्रिक बाबींना वेळ लागतो. त्यामुळे आशिया चषकासाठी स्वतंत्र प्रायोजक न आणता 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत दीर्घकालीन प्रायोजक शोधण्यावर भर आहे.
हेही वाचा – Duleep Trophy 2025 : मालेवार-पाटीदार जोडीचा शतकी धमाका! सेंट्रल झोनची पहिल्या दिवशी मजबूत पकड
वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासोबतच निवडणुका घ्याव्या लागणार –
बीसीसीआयला पुढील महिन्यात वार्षिक सर्वसाधारण सभा घेण्यासोबतच निवडणुका घ्याव्या लागणार आहेत. राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायद्याची अधिसूचना अद्याप जारी झालेली नसल्याने बीसीसीआयला निवडणुका टाळता येणार नाहीत. सध्या बीसीसीआय लोढा समितीच्या शिफारशींनुसार तयार झालेल्या संविधानानुसार चालते.
नवीन क्रीडा कायद्याची अधिसूचना जारी होईपर्यंत लोढा समितीच्या शिफारशी लागू राहतील, ज्यात 70 वर्षांवरील व्यक्ती पदाधिकारी होऊ शकत नाही, अशी तरतूद आहे. मात्र, नवीन कायद्याच्या अधिसूचनेनंतर ही वयोमर्यादा लागू राहणार नाही.





