Alia Bhatt : ‘रॅाकी और राणी की प्रेम कहानी’ला दोन मोठे पुरस्कार; आलियाकडून त्या गाण्याचा BTS VIDEO शेअर

Alia Bhatt : ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘रॉकी और राणी की प्रेम कहानी’ या चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याने अभिनेत्री आलिया भटने आनंद व्यक्त केला आहे. ज्यावेळी हा चित्रपट रिलीज झाला होता त्यावेळी या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला होता. परिणामी बॅाक्स अॅाफिसवर चित्रपटाने चांगली कमाई केली. आता चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट प्रदान करणारा मनोरंजन पुरस्कार मिळाल्याने आनंद व्यक्त केला जात आहे. तसेच चित्रटातील कोरिओग्राफरला नृत्य दिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन करण जोहर याने केले आहे. चित्रपटातील सर्वच्या सर्व गाणी हिट ठरली. मात्र, आलिया आणि रणवीर सिंहवर या दोघांवर चित्रित झालेले धिंढोरा बाजे रे हे गाण्याने प्रेक्षकांची दाद मिळवली. चित्रपटाला पुरस्काराच्या घोषणेनंतर अभिनेत्री आलिया भटने तिच्या इन्स्टाग्राम अंकाटवरून या गाण्याचा बीटीएस व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओत तिने या गाण्यासाठी किती मेहनत घेतली आहे, हे दिसत आहे. हे गाण ज्यांनी कोरिओग्राफ केले आहे, त्या वैभवी मर्चंट यांना सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शनाचा पुरस्कार मिळाला आहे. काल रात्री रणवीरने चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती. आता आलिया भटने या कामगिरीचा आनंद साजरा करणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
View this post on Instagram
या व्हिडीओत आलिया कोरिओग्राफरसोबत धिंढोरा बाजे रे साठी सराव करताना दिसत आहे. तिने चित्रपटाच्या टीममधील प्रत्येक सदस्याचे कौतुक देखील केले आहे. शेअर केलेल्या बीटीएस व्हिडिओमध्ये, आलिया भट कोरिओग्राफरसोबत नाचताना दिसत आहे. आलिया वैभवीच्या दिग्दर्शनाखाली आणि मार्गदर्शनाखाली डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.
“या आठवणींना उजाळा देत आज माझे हृदय भरून आले आहे. ‘धिंडोरा बाजे रे’ ही तुझी प्रतिभा आहे वैभवी मर्चंट.” असं या व्हिडीओला आलियाने कॅप्शन दिले आहे. तिने पुढे लिहिले, “#RRKPK च्या अद्भुत प्रवासाबद्दल मी नेहमीच आभारी राहीन आणि या टीममधील प्रत्येक सदस्यासाठी, हा विजय तुमचा आहे.





