Dacoit Box Office : डकैतने पहिल्या दिवशी केली ‘इतक्या’ कोटींची कमाई; पाहा बॅाक्स अॅाफिस कलेक्शन
Dacoit Box Office : बहुचर्चित डकैत सिनेमाला पहिल्या दिवशी बॅाक्स अॅाफिसवर समाधानकारक प्रतिसाद मिळाला आहे.

Dacoit Box Office : धुरंधर द रिव्हेंन्ज या रणवीर सिंग अभिनित सिनेमाने प्रदर्शित होऊन 23 दिवस उलटूनही बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा कायम ठेवला आहे. सिनेमाच्या कमाईत अजूनही घट न दिसता तो दमदार कामगिरी करत आहे.
या सिनेमामुळे अनेक सिनेमांचे प्रदर्शन लांबवण्यात आले. यामध्ये यशचा टॅाक्सिक आणि अक्षय कुमारचा भूत बंगला सिनेमांचा समावेश आहे. मात्र, डकैत या सिनेमाने धाडस दाखवले आणि हा सिनेमा 10 एप्रिलला प्रदर्शित करण्यात आला.
डकैतमध्ये अदिवी शेष आणि मृणाल ठाकूर मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाच्या रिलीजच्या पहिल्याच दिवशी एकूण 6.50 कोटींची समाधानकारक कमाई केली आहे. तेलुगू भाषेत 5.60 कोटी आणि हिंदीमध्ये 0.90 कोटींची कमाई केली आहे.
सिनेमा पाहिल्यानंतर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. दुसरीकडे धुरंधर द रिव्हेंन्ज सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर धूमाकूळ घालत आहे. धुरंधर: द रिव्हेंज’ने जागतिक स्तरावरही शानदार कामगिरी करत 1671.26 कोटींचा टप्पा पार केला आहे.
एकूणच ‘धुरंधर: द रिव्हेंज’चा बॉक्स ऑफिसवरील दबदबा अजूनही कायम असून नव्या सिनेमांसाठी त्याच्या कमाईशी स्पर्धा करणे कठीण ठरत आहे. डकैतने सिनेमाचे पोस्टर, टीझर आणि ट्रेलर उत्तम होते.
प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल असे वाटत होते. मात्र, पहिल्या दिवशीचा प्रतिसाद समाधानकारक मिळाला आहे. त्यामुळे डकैतच्या टीमने अजून काही दिवसानंतर सिनेमा रिलीज करायला काही हरकत नव्हती अशीही चर्चा सोशळ मीडियावर आहे.
मात्र, एका दिवस सिनेमाचे यश सांगता येत नाही. पुढील काही दिवसात डकैत बॅाक्स अॅाफिसवर कशी कामगिरी करतो यानंतर सिनेमाला कसा प्रतिसाद मिळाला हे सांगणे शक्य होईल.
धुरंधरची हवा कायम
Sacnilk च्या अहवालानुसार, ‘धुरंधर द रिव्हेंज’ ने 23 व्या दिवशी 6.70 कोटींची कमाई केली आहे. सिनेमाची भारतातील एकूण कमाई तब्बल 1055.12 कोटींवर पोहोचली आहे. या सिनेमात रणवीर सिंह, अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी अशी तगडी स्टारकास्ट आहे.
हेही वाचा : Earthquake tremors : मराठवाडा भूकंपाने हादरला! हिंगोलीसह, परभणी, नांदेडला भूकंपाचे सौम्य धक्के




