Filmmaker Pass Away : मनोरंजन विश्वावर शोककळा ! ‘या’ राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाचे निधन
मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी (Filmmaker Pass Away) समोर आली आहे. आपल्या संवेदनशील आणि कलात्मक दिग्दर्शनाने चित्रपटसृष्टीवर अमिट छाप पाडणारे ज्येष्ठ मल्याळम दिग्दर्शक आर. सरथ (वय ६३) यांनी जगाचा निरोप घेतला आहे.

Filmmaker Pass Away : मनोरंजन विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी (Filmmaker Pass Away) समोर आली आहे. आपल्या संवेदनशील आणि कलात्मक दिग्दर्शनाने चित्रपटसृष्टीवर अमिट छाप पाडणारे ज्येष्ठ मल्याळम दिग्दर्शक आर. सरथ (वय ६३) यांनी जगाचा निरोप घेतला आहे.
तिरुवनंतपुरममधील एका खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने संपूर्ण दाक्षिणात्य सिनेसृष्टीसह देशभरातील कलाविश्वावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, चाहत्यांसह अनेक नामवंत कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
इंग्रजी साहित्यात पदव्युत्तर पदवी घेतलेल्या आणि चित्रपट निर्मितीचे (Filmmaker Pass Away) रीतसर प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आर. सरथ यांनी आपल्या कारकिर्दीची पायाभरणी माहितीपटांमधून (Documentaries) केली होती.
कला, समृद्ध संस्कृती आणि ऐतिहासिक वारसा या विषयांवर त्यांनी विशेष भर दिला. ‘द पेंटेड एपिक्स’ हा त्यांचा माहितीपट विशेष गाजला होता, तसेच ‘भूमिक्कोरू चरमगीथम’ या लघुपटाचेही त्यांनी दिग्दर्शन केले होते.
त्यानंतर त्यांनी मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये पदार्पण करत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. ‘सायान्हम’, ‘शीलाबती’, ‘स्थिती’ आणि ‘बुद्धन चिरिक्कुन्नु’ यांसारख्या अनेक आशयघन चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले. विशेषतः त्यांच्या ‘सायान्हम’ या चित्रपटाला समीक्षकांची दाद तर मिळालीच, शिवाय या चित्रपटाने तब्बल सात केरळ राज्य चित्रपट पुरस्कार पटकावून इतिहास घडवला.
त्यांच्या याच उत्कृष्ट कामासाठी त्यांना दिग्दर्शकाच्या (Filmmaker Pass Away) सर्वोत्तम पदार्पणाचा मानाचा ‘इंदिरा गांधी पुरस्कार’ आणि मल्याळम भाषेतील सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी ‘राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले होते. ‘स्वयम: सेल्फलेस’ हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट ठरला. त्यांच्या निधनाने एका अभ्यासू आणि प्रयोगशील दिग्दर्शकाला भारतीय चित्रपटसृष्टीने गमावले आहे.






