JIGRA चा ट्रेलर प्रदर्शित; आलियाच्या भूमिकेने वेधले सगळ्यांचे लक्ष

मुंबई : बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असलेला अभिनेत्री आलिया भट हिचा ॲक्शन चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. आलिया भट हिला अनेकवेळा तुम्ही कॉमेडी, ड्रामा चित्रपटात पाहिले असेल. मात्र,या चित्रपटात ती एका वेगळ्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
काय आहे ट्रेलरमध्ये ?
इंस्टाग्रामवर टीझर ट्रेलर शेअर करताना आलिया भट्टने लिहिले की, ‘काउंटडाऊन सुरू. जिगराचा टीझर ट्रेलर आला आहे’.या ट्रेलरमध्ये बहीण भावाचे नाते आणि त्यांचे प्रेम पाहायला मिळत आहे. आपण हे नेहमीच बघत किंवा ऐकत आलो आहे की, भाऊ हा बहिणीची रक्षा करतो. मात्र, आपल्याला यामध्ये बहीण ही भावाची रक्षा करताना पाहायला मिळत आहे.
कधी रिलीज होणार हा चित्रपट?
हा चित्रपट 11 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. आलिया भटसोबत वेदांग रैना या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. आलिया भटची हि भूमिका प्रेक्षकांच्या किती पसंतीस पडते हे पाहणे महत्वाचे असणार आहे.





