#VijayHazareTrophy | महाराष्ट्राचा ऋतुराज गरजला…! ‘अशी’ कामगिरी करणारा जगातील एकमेव खेळाडू

Vijay Hazare Trophy 2022 – महाराष्ट्राचा स्टार फलंदाज ऋतुराज गायकवाड याने उत्तर प्रदेश विरुद्धच्या सामन्यात जबरदस्त कामगिरी केली आहे. त्याने क्रिकेट जगतातील मोठ्या विक्रमांना गवसणी घातली आहे. विजय हजारे करंडकातील महाराष्ट्र विरुद्ध उत्तर परदेश या उपांत्यपूर्व सामन्यात ऋतुराजने १५९ चेंडूत १० चौकार आणि १६ षटकारांच्या साहाय्याने २२० धावांची धडाकेबाज खेळी खेळली आहे.
#NZvsIND | ‘या’ कारणामुळे संजू सॅमसनला खेळवत नाही; शिखर धवनने स्पष्टच सांगितले!
सामन्यातील ४९व्या षटकात रुतुराज गायकवाडने शिवा सिंगला एका षटकात सलग ७ षटकार ठोकत इतिहास रचला आहे. लिस्ट ए क्रिकेटमध्ये एका षटकात ७ षटकार मारणारा रुतुराज गायकवाड हा जगातील पहिला फलंदाज ठरला आहे. तुम्हाला प्रश्न पडलं असेल की, एका षटकात ७ षटकार कसे? तर या षटकामध्ये एक चेंडू हा नो-बॉल देण्यात आला होता. म्हणजेच या षटकात ऋतुराजने ४३ फाटकावत अनोखा विक्रम रचला आहे.
लिस्ट ए क्रिकेटमधली ही रुतुराजची आतापर्यंतची सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे. या सामन्यात त्याने आपल्या पहिल्या १०० धावा १०९ चेंडूत पूर्ण केल्या होत्या. त्यानंतर त्याने पुढच्या ५० चेंडूत १२० धावा केल्या. ऋतुराजच्या या खेळीच्या जोरावर महाराष्ट्र संघाने ५० षटकांत ५ गडी गमावून ३३० धावा केल्या.
6⃣,6⃣,6⃣,6⃣,6⃣nb,6⃣,6⃣
Ruturaj Gaikwad smashes 4⃣3⃣ runs in one over! 🔥🔥
Follow the match ▶️ https://t.co/cIJsS7QVxK…#MAHvUP | #VijayHazareTrophy | #QF2 | @mastercardindia pic.twitter.com/j0CvsWZeES
— BCCI Domestic (@BCCIdomestic) November 28, 2022
लिस्ट ए क्रिकेट ( Vijay Hazare Trophy ) सामन्याच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम याअगोदर रोहित शर्माच्या नावावर होता. आता या विक्रमाच्या शर्यतीत रुतुराज गायकवाडने नाबाद २२० धावांच्या खेळीत १६ षटकार ठोकत रोहित शर्माची बरोबरी केली आहे. लिस्ट ए क्रिकेटच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत रुतुराज गायकवाड आता रोहितसोबत पहिल्या स्थानावर आहे.





