Sarfaraz Khan Record : सर्फराझ खानने रचला इतिहास! ३१ वर्षांपूर्वीचा ‘हा’ खास विक्रम मोडणारा भारताचा पहिलाच फलंदाज

Sarfaraz Khan broke fastest fifty record : भारतीय क्रिकेटमधील ‘रन मशीन’ म्हणून ओळखला जाणारा फलंदाज सर्फराझ खान सध्या आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे. प्रामुख्याने कसोटीपटू मानल्या जाणाऱ्या सर्फराझने आता मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येही (वनडे) टी-२० च्या स्टाईलने फलंदाजी करत नवा इतिहास रचला आहे. गुरुवारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने ३१ वर्षांपूर्वीचा जुना विक्रम मोडीत काढला.
भारतासाठी सर्वात वेगवान ‘लिस्ट-ए’ अर्धशतक –
विजय हजारे ट्रॉफीमध्ये मुंबईकडून पंजाबविरुद्ध खेळताना सर्फराझ खानने तुफानी फलंदाजी केली. त्याने अवघ्या १५ चेंडूत ५० धावा पूर्ण करून लिस्ट-ए क्रिकेटमधील भारतातील सर्वात वेगवान अर्धशतकाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी हा विक्रम अभिजीत काळे यांच्या नावावर होता, ज्यांनी १९९५ मध्ये बडोद्याविरुद्ध १६ चेंडूत अर्धशतक झळकावले होते.
भारतीय बल्लेबाज़ द्वारा पुरुष लिस्ट ए क्रिकेट में लगाए गए सबसे तेज़ अर्धशतक
15 गेंद – सरफ़राज़ ख़ान, मुंबई बनाम पंजाब, 2026
16 गेंद – अभिजीत काले, महाराष्ट्र बनाम बड़ौदा, 1995
16 गेंद – अतीत सेठ, बड़ौदा बनाम छत्तीसगढ़, 2021#SarfarazKhan #VijayHazareTrophy pic.twitter.com/DSRj1ECyKT— ESPNcricinfo हिंदी (@CricinfoHindi) January 8, 2026
तसेच २०२१ मध्ये अतीत सेठने १६ चेंडूत ५० धावा केल्या होत्या. या दोघांनाही मागे टाकत सर्फराझने ३१ वर्षांचा इतिहास पुन्हा लिहिण्यास भाग पाडले आहे. या सामन्यात त्याने एकूण २९ चेंडूत ६२ धावांची खेळी केली. मात्र, तरी देखील मुंबई संघाला अवघ्या एका धावेने पराभव पत्करावा लागला.
सलग तीन सामन्यांत ५०+ धावांचा पाऊस –
सर्फराझ खानची बॅट सध्या आग ओकत आहे. चालू विजय हजारे ट्रॉफीमधील त्याच्या कामगिरीवर एक नजर:
- पहिला सामना: ४९ चेंडूत ५५ धावा.
- दुसरा सामना: ७५ चेंडूत १५७ धावांची महाविस्फोटक खेळी.
- तिसरा सामना: २९ चेंडूत ६२ धावा (१५ चेंडूत ५० पूर्ण).
हेही वाचा – Virat Kohli Video : वडोदरा विमानतळावर विराट कोहलीला घेरले चाहत्यांनी, सुरक्षा रक्षकांची धावपळ, पाहा VIDEO
आयपीएलमध्ये आता ‘यलो जर्सी’त दिसणार –
देशांर्तगत क्रिकेटमध्ये धावांचा डोंगर उभा करणाऱ्या सर्फराझने भारतीय कसोटी संघात आपली छाप पाडली होती, मात्र सध्या तो टीम इंडियाच्या बाहेर आहे. पण चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे यंदाच्या आयपीएलमध्ये सर्फराझ खान सीएसकेकडून खेळताना दिसणार आहे. लिलावात सीएसकेने त्याला ७५ लाख रुपयांना आपल्या संघात सामील केले आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सर्फराझची ही ‘फायर’ कामगिरी आयपीएलमध्ये काय कमाल करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





