Devdutt Padikkal Record : देवदत्त पडिक्कलने रचला इतिहास! ‘असा’ पराक्रम करणारा भारताचा पहिलाच फलंदाज

Devdutt Padikkal record in Vijay Hazare Trophy : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमध्ये देवदत्त पडिक्कलच्या बॅटने सध्या धावांचा पाऊस पाडण्यास सुरुवात केली आहे. विजय हजारे ट्रॉफी २०२५-२६ च्या उपांत्यपूर्व (Quarter-final) फेरीत मुंबईविरुद्ध खेळताना पडिक्कलने नाबाद अर्धशतकी खेळी साकारली आणि एका खास विक्रमाला गवसणी घातली. विजय हजारे ट्रॉफीच्या दोन वेगवेगळ्या हंगामात ७०० हून अधिक धावा करणारा तो भारताचा पहिलाच फलंदाज ठरला आहे.
बंगळुरूच्या मैदानात रचला इतिहास –
बंगळुरू येथील ‘बीसीसीआय सेंटर ऑफ एक्सीलेंस’ मैदानावर कर्नाटक आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात पडिक्कलला ७०० धावांचा क्लब गाठण्यासाठी ६० धावांची गरज होती. कर्नाटकच्या डावातील २४ व्या षटकात शम्स मुलानीच्या चेंडूवर धाव घेत त्याने हा टप्पा पार केला. यापूर्वी २०२०-२१ च्या हंगामातही त्याने ७३७ धावा केल्या होत्या.
विजय हजारे ट्रॉफी: एका हंगामात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू:
| खेळाडू | संघ | हंगाम | धावा |
| नारायण जगदीसन | तामिळनाडू | २०२२-२३ | ८३० |
| पृथ्वी शॉ | मुंबई | २०२०-२१ | ८२७ |
| करुण नायर | विदर्भ | २०२४-२५ | ७७९ |
| देवदत्त पडिक्कल | कर्नाटक | २०२०-२१ | ७३७ |
| मयंक अग्रवाल | कर्नाटक | २०१७-१८ | ७२३ |
| देवदत्त पडिक्कल | कर्नाटक | २०२५-२६ | ७२१* |
हेही वाचा – Shikhar Dhawan Engaged : ‘गब्बर’च्या आयुष्यात ‘सोफी’ची एन्ट्री! एंगेजमेंट रिंग फ्लॉन्ट करत दिली गोड बातमी
हंगामात ४ शतके आणि २ अर्धशतके –
History written in the Vijay Hazare Trophy!🥳
Devdutt Padikkal became the first batter ever to score 700+ runs in tournament’s two different seasons.#VijayHazareTrophy #DevduttPadikkal #CricketRecords #HistoricSeason #DomesticCricket #IndianCricket@BCCI @devdpd07 pic.twitter.com/GNztGGTY5q
— Doordarshan Sports (@ddsportschannel) January 12, 2026
पडिक्कलने या संपूर्ण हंगामात सातत्यपूर्ण फलंदाजी केली आहे. त्याने झारखंड (१४७), केरळ (१२४), पुद्दुचेरी (११३) आणि त्रिपुरा (१०८) विरुद्ध शतके झळकावली. राजस्थानविरुद्ध त्याचे शतक अवघ्या ९ धावांनी (९१) हुकले होते. या जबरदस्त कामगिरीमुळे त्याने पुन्हा एकदा भारतीय वनडे संघाच्या निवडीसाठी दावेदारी मजबूत केली आहे.
हेही वाचा – Mohammad Nabi : ‘माझा काय संबंध?’, मुस्तफिझूरबद्दल प्रश्न विचारताच मोहम्मद नबी बांगलादेशी पत्रकारावर संतापला
मुंबईचा पराभव; कर्नाटक उपांत्य फेरीत –
या सामन्यात पडिक्कलने ९५ चेंडूंत नाबाद ८१ धावांची खेळी केली. पावसाचा व्यत्यय आलेल्या या सामन्यात कर्नाटकने मुंबईचा डकवर्थ-लुईस नियमानुसार ५५ धावांनी पराभव केला आणि दिमाखात उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुंबईच्या स्टार गोलंदाजांना पडिक्कलची विकेट घेण्यात अपयश आले.





