Pune News : पुण्यात सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षकांकडून शिवीगाळ; ‘अमय’ हॉटेल परिसरातील घटना
Pune News : बी.एम.सी.सी. रोडवरील गोखले इन्स्टिट्यूट परिसरातील अमय हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे.

Pune News : बी.एम.सी.सी. रोडवरील गोखले इन्स्टिट्यूट परिसरातील अमय हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावण्याच्या कारणावरून सेवानिवृत्त पोलिस अधिकाऱ्याला सुरक्षा रक्षकांनी शिवीगाळ करत दमदाटी केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५१ व ३५२ अन्वये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. (Pune News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार भानुप्रताप शंकरराव बर्गे (रा. प्रभात रोड) हे दर रविवारी सकाळी मित्रांसह अमय हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी जातात. शनिवारी (२ ऑगस्ट) सकाळी साडेसातच्या सुमारास ते हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी घेऊन गेले असता, पार्किंगमध्ये जागा रिकामी दिसत असूनही सुरक्षा रक्षकांनी आत प्रवेश करण्यास नकार दिला. (Pune News)
यावेळी बर्गे हे स्वतः गाडीतून उतरून गेट उघडू लागले असता, तेथील दोन सुरक्षा रक्षक त्यांच्या अंगावर धावून आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आपण सेवानिवृत्त पोलिस असल्याचे सांगूनही “पोलीस है तो क्या हुआ” असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली तसेच बघून घेण्याची धमकी देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. यानंतर संबंधित सुरक्षा रक्षकांनी आपली चूक लक्षात आल्यावर माफी मागितल्याचाही उल्लेख तक्रारीत करण्यात आला आहे. (Pune News)
त्यानंतर तक्रारदारांनी संबंधित सुरक्षा संस्थेच्या पर्यवेक्षकाला दूरध्वनीद्वारे घटनेची माहिती दिली. मात्र, सुरक्षा रक्षकांच्या वर्तनाबाबत कारवाई व्हावी, अशी मागणी करत त्यांनी डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. (Pune News)
या प्रकरणी डेक्कन पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून संबंधित सुरक्षा रक्षकांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम १६८ अन्वये नोटीस बजाविण्याची प्रक्रिया सुरू केली. (Pune News)
Pune news : बी. जे. मेडिकलमध्ये रॅगिंगचा गंभीर आरोप; एमबीबीएस विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता
Pune news : पावसामुळे पुणे शहरातील वाहतूक विस्कळीत; भिडे पूल, नदीपात्रातील पूल बंद !





