Varanasi Movie : गेल्या काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू याच्या बहुचर्चित वाराणसी चित्रपटाचा एक भव्यदिव्य स्वरुपाचा चित्रपटाचा लाँच कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात स्वतः महेश बाबू आणि चित्रपटातील कास्ट उपस्थित होती. या चित्रपटाचे पोस्टर, टीझर समोर आल्यानंतर मोठी उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. अशातच चित्रपटाच्या रिलीजडेट विषयी मोठी अपडेट समोर आली आहे. बाहुबली, आर. आर. आर. अशा मोठ्या स्केलवर चित्रपट तयार करणारे निर्माते, दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे बजेट तब्बल १३०० कोटी रुपये असल्याची माहिती आहे. चित्रपटात महेश बाबू आणि प्रियांका चोप्रा पहिल्यांदाच एकमेकांसोबत स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. पृथ्वीराज सुकुमारन चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसी हा चित्रपट जगभरात ९ एप्रिल २०२७ रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याची माहिती आहे. राजामौलींच्या चित्रपटाकडून अपेक्षा खूप जास्त आहेत. चित्रपटातील महेश बाबू आणि प्रियांका चोप्राचे लूक समोर आले आहेत. त्यामुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपटाच्या रिलीजची तारीख समोर आली असली तरी निर्मात्यांकडून अद्यापर्यंत अधिकृत कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाही. हा चित्रपट २०२७ मधील महागडा चित्रपट ठरणार असल्याचे बोलले जात आहे. चित्रपटात काम करण्यासाठी अभिनेत्री प्रियांका चोप्राने ३० कोटी इतके मोठे मानधन घेतले आहे. हेही वाचा : अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “भक्ती हा खूप वैयक्तिक विषय”