\nपुढे त्या म्हणाल्या, “माझ्या माध्यमातून लोकांना आशीर्वाद मिळत असेल तर माझ्या आयुष्यातील हा सर्वांत आनंदी क्षण आहे. मी येथे स्पष्टीकरण देण्यासाठी आले नाही.आयुष्याकडे पाहण्याचा माझा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. माझे काही असे नाते आहेत ज्यांचा मी आदर करते. लोकांशी मला काही देणंघेणं नाही. जी लोकं ट्रोल करत आहेत, ते त्यांच्या आयुष्यात खुश राहू देत. पण त्या लाखो लोकांबद्दल काय, जे याच्याशी जोडले जाऊ शकले आणि ज्यांना ते आपलंसं वाटलं? माझ्यासाठी ती लोकं महत्त्वाची आहेत.”

\n

ट्रोलिंगला प्रत्युत्तर देण्यास बांधिल नाही

\n

यावेळी सुधा चंद्रन यांनी त्यांच्या आयुष्यातील भयंकर अपघाताच्या आठवणींना उजाळा दिला. “लोक काय म्हणतील, याचा विचार मी कधीच माझ्या आयुष्यात केला नाही. माझ्या अपघातानंतरही लोकांनी म्हटलं होतं की काय मूर्खपणा करतेस तू? पण जेव्हा तीच यशोगाथा बनते, तेव्हा लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात. माझ्या मते, भक्ती हा खूप वैयक्तिक विषय आहे. मी कोणाच्याच भक्तीबद्दल मतं बनवत नाही किंवा टीका करत नाही. मी कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास किंवा ट्रोलिंगला प्रत्युत्तर देण्यास बांधिल नाही. मी स्वबळावर यशस्वी झालेली महिला आहे आणि यापुढेही माझं आयुष्य अशाच पद्धतीने अत्यंत आदरपूर्वक जगेन”, असं त्या पुढे म्हणाल्या. Sudha Chandran |

\n

दरम्यान, सुधा यांनी नागिनच्या पहिल्या दोन सीझनमध्ये षडयंत्र रचणारी आई यामिनी रहेजा म्हणून आपल्या अभिनयाने खूप लोकप्रियता मिळवली. याशिवाय त्यांनी ‘ये हैं मोहब्बतें’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘माता की चौकी’, ‘कलयुग में भक्ति की शक्ति’ अशा मालिकांमध्येही काम केले आहे. Sudha Chandran |

\n

हेही वाचा: 

\n

परिवहन मंत्र्यांनी धाडले आदेश; एसटीचा मोठा निर्णय; ‘ती’ अडचण दूर होणार!

\n

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “भक्ती हा खूप वैयक्तिक विषय”","thumbnailUrl":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/01/54-2.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"Pradnya Pawar","url":"https://www.dainikprabhat.com/author/pradnyapawareprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sudha-chandran-gives-a-befitting-reply-to-the-trolls-she-said-devotion-is-a-very-personal-matter#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/01/54-2.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sudha-chandran-gives-a-befitting-reply-to-the-trolls-she-said-devotion-is-a-very-personal-matter#webpage","name":"अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “भक्ती हा खूप वैयक्तिक विषय”","url":"https://www.dainikprabhat.com/actress-sudha-chandran-gives-a-befitting-reply-to-the-trolls-she-said-devotion-is-a-very-personal-matter","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sudha-chandran-gives-a-befitting-reply-to-the-trolls-she-said-devotion-is-a-very-personal-matter#primaryimage","url":"https://axrmzc5ulsbu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2026/01/54-2.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sudha-chandran-gives-a-befitting-reply-to-the-trolls-she-said-devotion-is-a-very-personal-matter#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/actress-sudha-chandran-gives-a-befitting-reply-to-the-trolls-she-said-devotion-is-a-very-personal-matter","name":"अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “भक्ती हा खूप वैयक्तिक विषय”"}}]}}}

अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “भक्ती हा खूप वैयक्तिक विषय”

Updated On:
अभिनेत्री सुधा चंद्रन यांचे ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “भक्ती हा खूप वैयक्तिक विषय”

Sudha Chandran |  अभिनेत्री आणि डान्सर सुधा चंद्रन यांचा एका पूजेदरम्यानचा व्हिडिओ सोशल मिडियावर तुफान व्हायरल झाला. यात पूजेदरम्यान त्यांच्या अंगात देवी आल्याचे पाहायला मिळते. मात्र यावरून त्यांना सोशल मिडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले. यावर अखेर सुधा चंद्रन यांनी मौन सोडत ट्रोल करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.

एका मुलाखतीदरम्यान सुधा चंद्रन म्हणाल्या की, “मला कोणालाही काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज वाटत नाही आणि भक्तीमुळेच मी अशा प्रकारे प्रेरित झाले होते. व्हिडीओ व्हायरल झाल्याचा मी फार विचार करत नाही. तो एक असा क्षण होता, जो प्रत्येकजण जगू पाहतो. देवी शक्ती तुमच्यात येऊन तुम्हाला ती ऊर्जा देते. देवीचा आशीर्वाद खूप कमी लोकांना मिळतो आणि मी त्यापैकी एक होते.”

पुढे त्या म्हणाल्या, “माझ्या माध्यमातून लोकांना आशीर्वाद मिळत असेल तर माझ्या आयुष्यातील हा सर्वांत आनंदी क्षण आहे. मी येथे स्पष्टीकरण देण्यासाठी आले नाही.आयुष्याकडे पाहण्याचा माझा स्वतंत्र दृष्टीकोन आहे. माझे काही असे नाते आहेत ज्यांचा मी आदर करते. लोकांशी मला काही देणंघेणं नाही. जी लोकं ट्रोल करत आहेत, ते त्यांच्या आयुष्यात खुश राहू देत. पण त्या लाखो लोकांबद्दल काय, जे याच्याशी जोडले जाऊ शकले आणि ज्यांना ते आपलंसं वाटलं? माझ्यासाठी ती लोकं महत्त्वाची आहेत.”

ट्रोलिंगला प्रत्युत्तर देण्यास बांधिल नाही

यावेळी सुधा चंद्रन यांनी त्यांच्या आयुष्यातील भयंकर अपघाताच्या आठवणींना उजाळा दिला. “लोक काय म्हणतील, याचा विचार मी कधीच माझ्या आयुष्यात केला नाही. माझ्या अपघातानंतरही लोकांनी म्हटलं होतं की काय मूर्खपणा करतेस तू? पण जेव्हा तीच यशोगाथा बनते, तेव्हा लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात. माझ्या मते, भक्ती हा खूप वैयक्तिक विषय आहे. मी कोणाच्याच भक्तीबद्दल मतं बनवत नाही किंवा टीका करत नाही. मी कोणाच्याही प्रश्नांची उत्तरं देण्यास किंवा ट्रोलिंगला प्रत्युत्तर देण्यास बांधिल नाही. मी स्वबळावर यशस्वी झालेली महिला आहे आणि यापुढेही माझं आयुष्य अशाच पद्धतीने अत्यंत आदरपूर्वक जगेन”, असं त्या पुढे म्हणाल्या. Sudha Chandran |

दरम्यान, सुधा यांनी नागिनच्या पहिल्या दोन सीझनमध्ये षडयंत्र रचणारी आई यामिनी रहेजा म्हणून आपल्या अभिनयाने खूप लोकप्रियता मिळवली. याशिवाय त्यांनी ‘ये हैं मोहब्बतें’, ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ आणि ‘माता की चौकी’, ‘कलयुग में भक्ति की शक्ति’ अशा मालिकांमध्येही काम केले आहे. Sudha Chandran |

हेही वाचा: 

परिवहन मंत्र्यांनी धाडले आदेश; एसटीचा मोठा निर्णय; ‘ती’ अडचण दूर होणार!

आणखी संबंधित बातम्या

Nana Patekar Funeral: अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

2026-10-08 09:50:15

Nana Patekar Funeral:  अभिनयाचा बुलंद आवाज शांत! नाना पाटेकर यांच्या पार्थिवावर पुण्यात शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

2026-10-08 09:32:20

Nana Patekar Story: वयाच्या 13व्या वर्षी पोस्टर रंगवायचे, महिन्याला मिळायचे फक्त 35 रुपये; असा होता नाना पाटेकरांचा संघर्ष!

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

2026-10-08 08:37:20

Nana Patekar And Smita Patil: “नाना, तू सिनेमात काम केलंच पाहिजेस…”; स्मिता पाटील यांच्या एका आग्रहामुळे बदललं नाना पाटेकरांचं आयुष्य!

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

2026-10-08 08:13:04

Nana Patekar : हा चित्रपट ठरला टर्निंग पॅाईंट! खलनायकाच्या भूमिकेतूनच झाली एन्ट्री; जाणून घ्या नाना पाटेकरांचा सुरुवातीचा काळ

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश

2026-10-08 07:58:24

Nana Patekar Death: कार्डियाक अरेस्टने नाना पाटेकर यांचे निधन; 45 मिनिटे CPR देऊनही जीव वाचवण्यात अपयश