Varanasi Movie: प्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांच्या बहुप्रतीक्षित ‘वाराणसी’ या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. महेश बाबू, प्रियंका चोप्रा जोनस आणि पृथ्वीराज सुकुमारन यांसारखे दिग्गज कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिकांमध्ये दिसणार आहेत. चित्रपट २०२७ मध्ये प्रदर्शित होणार असला, तरी त्याआधीच त्याची एक खास झलक प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘वाराणसी’ चित्रपटाची विशेष झलक २४ एप्रिल २०२६ रोजी कॉमिक कॉन मेक्सिको या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात सादर केली जाणार आहे. या कार्यक्रमातील थंडर स्टेजवर एक खास पॅनेल आयोजित करण्यात येणार असून, त्यामध्ये ‘वाराणसी टू द वर्ल्ड’ या नावाने एक विशेष सादरीकरण होणार आहे. या सत्रात चित्रपटातील काही निवडक दृश्ये प्रेक्षकांना दाखवली जाणार आहेत. (Varanasi Movie) या कार्यक्रमात एस. एस. राजामौली यांचा एक खास व्हिडिओ संदेशही दाखवण्यात येणार आहे. तसेच चित्रपटाच्या चित्रीकरणामागील काही विशेष आणि यापूर्वी कधीही न दाखवलेले दृश्य (बिहाइंड द सीन) देखील सादर केले जातील. त्यामुळे चाहत्यांना चित्रपटाच्या निर्मिती प्रक्रियेची झलक जवळून पाहता येणार आहे. Varanasi Movie कार्यक्रमाच्या शेवटी चाहत्यांसोबत थेट संवाद साधण्याची संधीही दिली जाणार आहे. या संवाद सत्रात उपस्थितांना चित्रपटाबद्दल प्रश्न विचारता येतील. त्यामुळे ‘वाराणसी’बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे. (Varanasi Movie) यापूर्वीही ‘वाराणसी’ची एक खास झलक फ्रान्समधील प्रसिद्ध ले ग्रँड रेक्स या थिएटरमध्ये ट्रेलर फेस्टिव्हल दरम्यान दाखवण्यात आली होती. त्या वेळी प्रेक्षकांनी टाळ्या आणि शिट्ट्यांच्या गजरात याचे जोरदार स्वागत केले होते. यामुळे या चित्रपटाबद्दलची चर्चा आणखी वाढली आहे. या चित्रपटात महेश बाबू ‘रुद्र’ या भूमिकेत दिसणार आहेत, तर पृथ्वीराज सुकुमारन ‘कुंभा’ची भूमिका साकारत आहेत. प्रियंका चोप्रा जोनस ‘मंदाकिनी’च्या भूमिकेत झळकणार आहेत. या तिन्ही कलाकारांचे लूक आधीच समोर आले असून, सोशल मीडियावर त्यांची मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. ‘वाराणसी’ हा चित्रपट ७ एप्रिल २०२७ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. भव्य कथा, मोठा स्टारकास्ट आणि एस. एस. राजामौली यांचे दिग्दर्शन यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा विक्रम करू शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. Varanasi Movie