मुंबई- कोरोना विषाणूने साऱ्या जगात धुमाकुळ घातल्यानंतर आता चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या घरातही शिरकाव केला आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूडचे महानायक म्हणजेच अभिनेते ‘अमिताभ बच्चन’ आणि त्यांचा मुलगा अभिनेता ‘अभिषेक बच्चन’ यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर आता, दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही कोरोनानं शिरकाव केला आहे.
सुपरहिट ‘बाहुबली’ चित्रपटाचे दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह त्याच्या संपूर्ण कुटुंबाला कोरोनानं गाठलं आहे. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, स्वतः राजामौली यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे.
My family members and I developed a slight fever few days ago. It subsided by itself but we got tested nevertheless. The result has shown a mild COVID positive today. We have home quarantined as prescribed by the doctors.
— rajamouli ss (@ssrajamouli) July 29, 2020
राजामौली आपल्या ट्विट मध्ये म्हणाले कि, “काही दिवसांपासून मला व माझ्या कुटुंबियांना ताप येत होता. डॉक्टरांकडून औषधोपचार केल्यानंतर ताप उतरला होता. मात्र, तरीही आम्ही करोनाची चाचणी केली. चाचणी केल्यानंतर करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून आम्ही डॉक्टरांच्या सल्ल्यानं घरातच सेल्फ क्वारंटाइन करून घेतलं आहे. आमच्या कुटुंबातील कोणालाच करोनाची लक्षण नाहीत, पण सरकारच्या नियमांनुसार आम्ही खबरदारी घेत आहोत”. असं ट्विट त्यांनी केलं.