RCB vs GT : सॉल्टने स्टेडियमच्या बाहेर षटकार मारल्यानंतर; सिराजने ‘असा’ घेतला बदला, VIDEO होतोय व्हायरल

RCB vs GT Mohammed Siraj take revenge after Phil Salt hit 105 meter six : ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर मोहम्मद सिराजला भारतीय संघातून वगळण्यात आले. इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी त्याला संघात स्थान मिळाले नाही. त्यानंतर तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्येही भारतीय संघाचा भाग नव्हता. जसप्रीत बुमराह बाहेर पडल्यानंतरही सिराजला संधी देण्यात आली नाही. आता आयपीएल २०२५ मध्ये सिराजच्या गोलंदाजीची जादू दिसून येत आहे. मुंबई इंडियन्सनंतर त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची टॉप ऑर्डर उद्ध्वस्त केली.
बोल्ड करून षटकारांचे दिले प्रत्युत्तर –
आरसीबीचा सलामीवीर फिल साल्ट कसा फलंदाजी करतो हे सर्वांना माहिती आहे. त्याने मोहम्मद सिराजविरुद्ध आयपीएल २०२५ मधील सर्वात लांब षटकार मारला. सॉल्टचा हा षटकार एम चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर गेला. या षटकाराची लांबी १०५ मीटर होती. पण सिराज शांत बसणार नव्हता. त्याने पुढचा चेंडू १४४ किमी प्रतितास वेगाने टाकला आणि सॉल्टला क्लीन बोल्ड केले. चेंडूचा वेग इतका होता की ऑफ स्टंप काही फूट अंतरावर जाऊन पडली.
A Phil Salt orbiter 🚀
followed by…
A Mohd. Siraj Special \|/ 🫡
It's all happening in Bengaluru 🔥
Updates ▶ https://t.co/teSEWkWPWL #TATAIPL | #RCBvGT | @mdsirajofficial pic.twitter.com/a8whsXHId3
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2025
सिराजच्या आधीच्या षटकात वाचला होता सॉल्ट –
Once a Bowler Always a Terrific Bowler#RCBvGT #viratkholi #ShubmanGill #IPL2025 #TATAIPL #TATAIPL2025 #MohammedSiraj pic.twitter.com/GRiC3Th6DV
— Savage_Soul.10 (@CRICKETER11HERO) April 2, 2025
मोहम्मद सिराजने डावाच्या पहिल्याच षटकात फिल साल्टला बाद केले होते. तथापि, त्याला यष्टीरक्षक जोस बटलरने जीवनदान दिले होते. चेंडू सॉल्टच्या बॅटची कडा घेऊन यष्टीरक्षकाकडे गेला. तो एक सोपा झेल होता पण बटलरला पकडता आला नाही. यानंतर सॉल्टला आणखी एक जीवन मिळाले. तो क्रीजच्या बाहेर बराच होता पण मोहम्मद सिराजचा थ्रो स्टंपवर लागला नाही. दोन जीवनदान मिळाल्यानंतरही सॉल्टला १३ चेंडूत फक्त १४ धावा करता आल्या.
हेही वाचा – Abrar Ahmed : ‘शुबमन गिलला काय इशारा करत होतास?’, भारतीय चाहतीने अबरार अहमदला डिवचले, पाहा VIDEO
आरसीबी गुजरातसमोर ठेवले १७० धावांचे लक्ष्य –
सामन्याबद्दल बोलायचे, तर आरसीबी प्रथम फलंदाजी करताना लियाम लिव्हिंगस्टोनच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर गुजरात टायटन्ससमोर १६२ धावांचे लक्ष्य ठेवले आहे. संघाने २० षटकांत आठ विकेट्स गमावून १६९ धावा केल्या आहेत. गुजरातकडून मोहम्मद सिराजने तीन आणि साई किशोरने दोन विकेट्स घेतल्या. अर्शद खान, प्रसिध कृष्णा आणि इशांत शर्मा यांना प्रत्येकी एक विकेट्स मिळाली





