RCB vs GT : चिन्नास्वामीवर ‘विराट’ गर्जना! पडिक्कलच्या साथीने कोहलीने गुजरातला लोळवत साई सुदर्शनच्या शतकावर फेरलं पाणी
RCB vs GT : घरच्या मैदानावर खेळताना आरसीबीने गुजरात टायटन्सने दिलेले २०६ धावांचे कठीण आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले.

RCB vs GT Royal Challengers Bengaluru won by 5 Wickets : आयपीएल २०२६ च्या ३४ व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) गुजरात टायटन्सचा ५ गडी राखून पराभव करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. विराट कोहली आणि देवदत्त पडिक्कल यांच्या झंझावाती फलंदाजीच्या जोरावर बंगळुरूने २०६ धावांचे विशाल लक्ष्य १८.५ षटकात यशस्वीरीत्या पार केले. ज्यामुळे गुजरातला हंगामातील चौथा पराभव पत्करावा लागला.
घरच्या मैदानावर खेळताना आरसीबीने गुजरात टायटन्सने दिलेले २०६ धावांचे कठीण आव्हान ५ गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. या विजयाचा खरा शिल्पकार ठरला तो विराट कोहली, ज्याने ४४ चेंडूत ८१ धावांची स्फोटक खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि ४ उत्तुंग षटकार लगावले. त्याला युवा फलंदाज देवदत्त पडिक्कलने चोख साथ दिली. पडिक्कलने अवघ्या २७ चेंडूत ५५ धावा कुटल्या, ज्यामध्ये ६ षटकारांचा समावेश होता.
Clinical at home…Again! ❤️@RCBTweets jump to 2⃣nd spot on the points table with another win in front of a roaring Bengaluru crowd 🥳
Scorecard ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvGT | @RCBTweets pic.twitter.com/pYTwF4yzbo
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
विराटला जीवदान अन् गुजरातचा गेम ओव्हर –
You can put your faith in him when its a run chase 🙌
Virat Kohli reaches another #TATAIPL fifty 👏
Updates ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/zJlUA70Udp
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
प्रत्युत्तरात २०६ धावांचा पाठलाग करताना आरसीबीची सुरुवात तशी संथ होती. पहिल्याच चेंडूवर विराट कोहलीचा एक सोपा झेल वॉशिंग्टन सुंदरने सोडला. हे जीवदान गुजरातला प्रचंड महागात पडले. त्यानंतर विराट आणि पडिक्कलने गुजरातच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. या दोघांनी अवघ्या ४७ चेंडूत शतकीय भागीदारी रचली आणि ९ षटकांतच आरसीबीला १०० धावांच्या पार नेले. पडिक्कलने केवळ २० चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले, तर विराटने ३० चेंडूत पन्नास धावांचा टप्पा ओलांडला.
साई सुदर्शनचे शतक ठरले व्यर्थ –
📸 𝗛𝗶𝘀 𝗺𝗼𝗺𝗲𝗻𝘁! 🤩
Sai Sudharsan walks back after a magnificent 1⃣0⃣0⃣(58) 👏
Updates ▶️ https://t.co/5ZJjfv5Nr6#TATAIPL | #KhelBindaas | #RCBvGT pic.twitter.com/7FmeLETNKr
— IndianPremierLeague (@IPL) April 24, 2026
तत्पूर्वी, गुजरात टायटन्सकडून फलंदाजी करताना साई सुदर्शनने ५८ चेंडूत १०० धावांची शानदार शतकी खेळी केली. याच सामन्यात त्याने सर्वात वेगवान २००० आयपीएल धावांचा ख्रिस गेलचा विक्रमही मोडीत काढला. मात्र, कोहली-पडिक्कल जोडीच्या वादळापुढे सुदर्शनचे हे शतक फिके पडले. या विजयासह आरसीबीचे १० गुण झाले असून त्यांनी राजस्थान रॉयल्सला मागे टाकत गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावले आहे.





