RCB Highest Score : रजत पाटीदारच्या खेळीच्या जोरावर RCBचा ऐतिहासिक पराक्रम! प्लेऑफच्या इतिहासातील नोंदवली सर्वोच्च धावसंख्या
RCB Highest Score : आरसीबीने आयपीएल प्ले-ऑफ आणि नॉकआउटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.

RCB set record highest score IPL Playoffs 2026 : आयपीएल २०२६ मधील ‘क्वालिफायर-१’ सामन्यात आरसीबीच्या फलंदाजांनी गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसं काढली. धर्मशाला येथील मैदानावर पहिल्यांदा फलंदाजी करताना आरसीबीने कर्णधार रजत पाटीदारच्या वादळी ९१ धावांच्या जोरावर २० षटकांत ५ बाद तब्बल २५४ धावांचा महाकाय आणि अवाढव्य डोंगर उभा केला आहे. यासह आरसीबीने आयपीएल प्ले-ऑफ आणि नॉकआउटच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्येचा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे.
गुजरात टायटन्सचा ‘तो’ मोठा रेकॉर्ड मोडला!
या बाबतीत त्यांनी गुजरात टायटन्सचाच ३ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. आयपीएलच्या इतिहासात आतापर्यंत प्ले-ऑफ किंवा नॉकआउट सामन्यात २५० धावांचा टप्पा कोणत्याही संघाला ओलांडता आला नव्हता. यापूर्वीचा सर्वोच्च स्कोर गुजरात टायटन्सच्या नावावर होता. गुजरातने २०२३ मध्ये मुंबईविरुद्ध २३३ धावा कुटल्या होत्या.
RCB blaze to a mammoth total in Dharamsala! The highest score in a TATA IPL Playoffs match. 🚨
After Virat Kohli’s powerplay hitting, Rajat Patidar switched on the afterburners in the death overs. 💪
GT will have to pull off a record breaking chase in order to book a spot in… pic.twitter.com/ldsiHkOwjR
— Star Sports (@StarSportsIndia) May 26, 2026
आयपीएल नॉकआउट/प्ले-ऑफमधील सर्वोच्च धावसंख्या:
- २५४/५: आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स (धर्मशाला, २०२६) *
- २३३/३: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (अहमदाबाद, २०२३)
- २२८/५: मुंबई इंडियन्स विरुद्ध गुजरात टायटन्स (न्यू चंदीगड, २०२५)
- २२६/६: पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स (वानखेडे, २०१४)
- २२२/५: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई, २०१२)
३८ बाउंड्रीज ठोकत चेन्नईचा १४ वर्षांपूर्वीचा मोडला रेकॉर्ड –
महाकाय धावसंख्येसोबतच आरसीबीने या सामन्यात चौकार आणि षटकारांचा भयंकर पाऊस पाडला. आरसीबीचा संघ आता आयपीएल प्ले-ऑफमधील एकाच सामन्यात सर्वाधिक बाउंड्रीज (चौके-छक्के) मारणारा संघ बनला आहे. आरसीबीच्या फलंदाजांनी मिळून गुजरातविरुद्ध एकूण ३८ बाउंड्रीज लगावल्या. यापूर्वी हा विक्रम सीएसकेच्या नावावर होता, ज्यांच्या फलंदाजांनी २०१२ मध्ये दिल्लीविरुद्ध ३३ बाउंड्रीज ठोकल्या होत्या.
आयपीएल नॉकआउट/प्ले-ऑफमध्ये सर्वाधिक बाउंड्रीज मारणारे संघ:
- ३८: आरसीबी विरुद्ध गुजरात टायटन्स (धर्मशाला, २०२६) *
- ३३: सीएसके विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (चेन्नई, २०१२)
- ३२: पंजाब किंग्स विरुद्ध सीएसके (वानखेडे, २०१४)
- ३१: गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स (अहमदाबाद, २०२३)
आरसीबीच्या या वादळी फलंदाजीने गुजरातच्या छावणीत दहशथ पसरवली असून हा सामना पूर्णपणे एकतर्फी होण्याची शक्यता आहे.





