Sai Sudharsan Hit Wicket : हातातून बॅट सुटली अन् घात झाला! IPL च्या इतिहासात सुदर्शनसारखं दुर्दैवी कोणीच आऊट झालं नसेल, पाहा VIDEO
Sai Sudharsan Hit Wicket : साई सुदर्शनची एक भयंकर चूक आणि खराब नशीबच कारणीभूत ठरले. सुदर्शन अवघ्या १४ धावांवर अत्यंत विचित्र पद्धतीने 'हिट विकेट' होऊन तंबूत परतला.

Sai Sudharsan Hit Wicket Video Viral : आयपीएल २०२६ च्या ‘क्वालिफायर-१’ सामन्यात आरसीबीने दिलेल्या २५५ धावांच्या एव्हरेस्टसारख्या महाकाय लक्षाचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सची सुरुवात अतिशय खराब आणि दुर्दैवी झाली आहे. डावाच्या तिसऱ्या षटकातच गुजरातला त्यांचा फॉर्मात असलेला सलामीवीर साई सुदर्शनच्या रूपाने पहिला आणि सर्वात मोठा धक्का बसला. आरसीबीचा वेगवान गोलंदाज जेकब डफीने ही विकेट घेतली खरी, पण या विकेटमध्ये डफीच्या चेंडूच्या करामतीपेक्षा सुदर्शनची एक भयंकर चूक आणि खराब नशीबच कारणीभूत ठरले. सुदर्शन अवघ्या १४ धावांवर अत्यंत विचित्र पद्धतीने ‘हिट विकेट’ होऊन तंबूत परतला.
शॉट मारला खरा, पण हातातून बॅट सुटली अन् गेम झाला!
हा सर्व थरारक आणि चक्रावून टाकणारा प्रकार गुजरातच्या डावातील तिसऱ्या षटकात घडला. आरसीबीच्या जेकब डफीने सुदर्शनला ऑफ-स्टंपच्या बाहेर शॉर्ट ऑफ गुड लेंथ चेंडू टाकला. सुदर्शनने त्यावर मागे सरकत बॅकफुटवर एक कडक आणि दमदार कट शॉट मारला. चेंडू पॉईंटच्या क्षेत्ररक्षकाला चकवून बाउंड्रीच्या दिशेने वेगाने जातच होता, तेवढ्यात क्रीझवर काहीतरी अजब घडले. शॉट पूर्ण करत असताना सुदर्शनच्या हातातून बॅट निसटली.
सुदर्शन धावेसाठी धावला, मागे बेल्स उडाल्या!
Drama takes another turn in Dharamshala 🎭#SaiSudharsan departs in the most unusual fashion possible.
Playoff pressure bringing unbelievable moments 🍿#TATAIPL Playoffs Qualifier 1 👉 #RCBvGT | LIVE NOW 👉https://t.co/C6lvFqET52 pic.twitter.com/rvt5kVN51X— Star Sports (@StarSportsIndia) May 26, 2026
सुदर्शनच्या हातातून सुटलेली बॅट हवेत उडाली आणि थेट त्याच्या मागे असलेल्या यष्ट्यांवर जाऊन आदळली. सुदर्शनचे लक्ष आपल्या बॅटकडे नव्हते, तो शॉट मारल्याबरोबर नॉन-स्ट्रायकर एंडच्या दिशेने धावला होता. मात्र, त्याने मागे वळून पाहिले तोपर्यंत स्टंप्सवरील बेल्स उडाल्या होत्या. चेंडू बाउंड्रीबाहेर गेला असला, तरी क्रिकेटच्या नियमांनुसार सुदर्शनला मैदानावरच ‘हिट विकेट’ घोषित करण्यात आले. बाद झाल्याचे समजताच सुदर्शनने डोळे बंद करून कपाळावर हात मारून घेतला, कारण आरसीबीला त्याने फुकटची विकेट गिफ्ट केली होती. ज्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
गुजरातच्या प्ले-ऑफच्या आशेला मोठा सुरुंग –
२५५ धावांच्या विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी गुजरात टायटन्सला त्यांच्या दोन्ही सलामीवीरांकडून वादळी सुरुवातीची अपेक्षा होती. साई सुदर्शन या हंगामात तुफान फॉर्मात आहे. बाद होण्यापूर्वी त्याने अवघ्या ९ चेंडूंत ३ सलग चौकार ठोकून १४ धावा केल्या होत्या. तो चांगल्या लयीत दिसत होता, पण नशिबाने पाठ फिरवल्यामुळे पॉवरप्लेमध्येच गुजरातने आपली सर्वात मुख्य विकेट गमावली.





