RCB Reaches Final : ‘ई साला कप नम्दे’ची पुन्हा साद! आरसीबीची फायनलमध्ये धडक; ग्रेस हॅरिसच्या वादळापुढे दीप्तीची खेळी व्यर्थ
RCB Reaches Final : आरसीबी यंदाच्या हंगामात फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.

RCB Reaches Final in WPL 2026 : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२६ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने आपला दबदबा कायम राखत अंतिम फेरीत धडक मारली आहे. १८ व्या सामन्यात आरसीबीने यूपी वॉरियर्सचा (UPW) ८ गडी राखून पराभव केला. या मोठ्या विजयासह आरसीबी यंदाच्या हंगामात फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरला आहे.
आरसीबीची वादळी फलंदाजी –
यूपी वॉरियर्सने दिलेल्या १४४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आरसीबीने अत्यंत आक्रमक सुरुवात केली. सलामीवीर ग्रेस हॅरिसने मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. तिने अवघ्या ३७ चेंडूत ७५ धावांची स्फोटक खेळी करत विजयाचा पाया रचला. ९ व्या षटकापर्यंत आरसीबीने एकही गडी न गमावता १०८ धावा फलकावर लावल्या होत्या. हॅरिस बाद झाल्यानंतर कर्णधार स्मृती मानधना आणि जॉर्जिया वोल यांनी १४ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर विजयावर शिक्कामोर्तब केला.
यूपी वॉरियर्सची फलंदाजी गडगडली –
तत्पूर्वी, नाणेफेक जिंकून आरसीबीने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यूपी वॉरियर्सची सुरुवात चांगली झाली होती. कर्णधार मेग लॅनिंग (४१ धावा) आणि दीप्ती शर्मा (५५ धावा) यांनी झुंजार फलंदाजी केली. ती १८ व्या षटकात अर्धशतक पूर्ण करुन ५५ धावांवर बाद झाली. मात्र, यूपीचे इतर फलंदाजी आरसीबीच्या शिस्तबद्ध गोलंदाजीपुढे अपयशी ठरले.
Top of the table ✅
Final spot sealed ✅@RCBTweets with yet another 𝗕𝗢𝗟𝗗 show in #TATAWPL 2026 ❤️🥳Updates ▶️ https://t.co/IgbbgWV0xt #KhelEmotionKa | #UPWvRCB pic.twitter.com/xuAox6fGWG
— Women’s Premier League (WPL) (@wplt20) January 29, 2026
आरसीबीकडबव गोलंदाजी करताना नादिन डी क्लर्कने युपीला महत्त्वाचे धक्के दिले. एमी जोन्स (१), हरलीन देओल (१४), क्लो ट्रायन (६) आणि श्वेता सहरावत (७) झटपट बाद झाल्यामुळे यूपीला २० षटकांत ८ बाद १४३ धावांपर्यंतच मजल मारता आली.
फायनलमध्ये आरसीबी सज्ज!
स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखाली आरसीबीने या विजयाने आपली दावेदारी प्रबळ केली आहे. फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागात संघ सध्या जबरदस्त लयीत असून आता चाहत्यांना प्रतीक्षा आहे ती डब्ल्यूपीएल २०२६ च्या जेतेपदाची.





