Aryna Sabalenka : सबालेंकाने स्वितोलिनाचा पराभव करत रचला इतिहास! सलग चौथ्यांदा गाठली ऑस्ट्रेलियन ओपनची फायनल
Aryna Sabalenka : आर्यना सबालेंका सलग चौथ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनच्या अंतिम फेरीत पोहोचली आहे.

Aryna Sabalenka reached Australian Open Final 2026 : जगातील पहिल्या क्रमांकाची टेनिसपटू अरिना सबालेंका हिने ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये आपला दबदबा कायम राखला आहे. गुरुवारी, २९ जानेवारी रोजी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात सबालेंकाने युक्रेनच्या एलिना स्वितोलिना हिचा सरळ सेटमध्ये पराभव करत सलग चौथ्यांदा या स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे.
मैदानावरील तणाव अन् राजकीय सावट –
सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही खेळाडूंमध्ये तणाव जाणवत होता. युक्रेन-रशिया युद्ध आणि त्याला बेलारूसने दिलेला पाठिंबा यामुळे स्वितोलिनाने सामन्यापूर्वी सबालेंकासोबत फोटो काढण्यास नकार दिला. सामन्यादरम्यान सबालेंकाच्या ओरडण्यावरून (Grunting) अंपायरने तिला ताकीद दिली, ज्यावर सबालेंकाने रिव्ह्यू देखील घेतला. मात्र, या सर्व वादानंतर सबालेंकाने आपला खेळ अधिक आक्रमक केला.
अवघ्या ७६ मिनिटांत विजय –
सबालेंका आता सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावण्यासाठी सज्ज
रॉड लेव्हर एरिनावर झालेल्या या सामन्यात सबालेंकाने अवघ्या १ तास १६ मिनिटांत स्वितोलिनाचे आव्हान ६-२, ६-३ असे संपुष्टात आणले.
Napetost raste na teniskom terenu dok Ukrajinka Elina Svitolina odbija da se rukuje sa Beloruskinjom Arynom Sabalenkom. Sabalenka igra pod neutralnom zastavom.#TeniskiDrama #ElinaSvitolina #ArynaSabalenka pic.twitter.com/An44cOoEJV
— Ljiljana Jovanovic (@Ljiljannovic) January 29, 2026
- पहिला सेट: सबालेंकाने सुरुवातीला चुका केल्या, पण लवकरच सावरून स्वितोलिनाची सर्व्हिस ब्रेक केली आणि ६-२ असा सेट जिंकला.
- दुसरा सेट: दुसऱ्या सेटमध्ये स्वितोलिनाने मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला, पण सबालेंकाच्या ताकदीपुढे तिचा निभाव लागला नाही. सबालेंकाने सलग तीन गेम जिंकत ६-३ अशा फरकाने सेट आणि सामना खिशात घातला.
हेही वाचा – Delhi U23 Cricketers : दिल्ली क्रिकेट पुन्हा वादाच्या भोवऱ्यात! पुद्दुचेरी दौऱ्यावर गेलेल्या २ खेळाडूंवर गंभीर आरोप
सबालेंकाने रचला इतिहास –
या विजयासह अरिना सबालेंका ‘ओपन एरा’मध्ये ऑस्ट्रेलियन ओपनच्या सलग चौथ्यांदा अंतिम फेरीत पोहोचणारी तिसरी खेळाडू ठरली आहे. यापूर्वी असा पराक्रम केवळ दोन दिग्गजांनाच जमला होता:
- एवोन गुलागोंग (ऑस्ट्रेलिया): सलग ७ फायनल (१९७१-७७)
- मार्टिना हिंगिस (स्वित्झर्लंड): सलग ६ फायनल (१९९७-२००२)
सबालेंका आता सलग तिसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन ओपनचे जेतेपद पटकावून हॅट्ट्रिक साधण्याच्या इराद्याने अंतिम फेरीत उतरेल.





