IPL 2025 : आरसीबीच्या जेतेपदासाठी चाहत्याचं देवाकडं साकडं, VIDEO होतोय तुफान व्हायरल

RCB fan praying for the team’s IPL 2025 victory : आयपीएल २०२५ च्या प्लेऑफला आज, २९ मे पासून सुरुवात होत आहे. पहिला क्वालिफायर सामना आरसीबी आणि पीबीकेएस यांच्यात होतआहे. या सामन्याला विशेष महत्त्व आहे, कारण यात विजयी होणारा संघ थेट ३ जून रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. आरसीबीला पहिल्यांदाच आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची संधी आहे आणि चाहते आपल्या लाडक्या संघासाठी प्रार्थना करत आहेत. याच दरम्यान, एका आरसीबी चाहत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पहिल्या क्वालिफायरसाठी आरसीबी सज्ज होत असताना, चाहत्यांमध्ये उत्साह आणि जोश शिगेला पोहोचला आहे. आपला संघ आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकावा, यासाठी चाहते देवाला साकडं घालत आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक उत्साही आरसीबी चाहता मंदिरात जाऊन संघाच्या विजयासाठी प्रार्थना करताना दिसत आहे. या व्हिडिओने आरसीबीच्या चाहत्यांचे संघाविषयीचे प्रेम आणि भावनिक नातं पुन्हा एकदा अधोरेखित केलं आहे.
आरसीबीच्या चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल –
If god is real RCB will touch the IPL trophy this year. pic.twitter.com/YkaZr2pfG9
— Kevin (@imkevin149) May 29, 2025
या व्हिडिओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून, अनेक चाहते या भावनेला पाठिंबा देत आहेत. आयपीएलमधील सर्वात लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या आरसीबीला अनेकदा अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. तरीही, चाहते नेहमीच संघाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. या व्हायरल व्हिडिओमुळे पहिल्या क्वालिफायर सामन्यापूर्वी आरसीबीच्या विजयाची आशा आणखी बळकट झाली आहे.
हेही वाचा – IPL 2025 : ‘यंदा ‘हा’ संघ पटकावणार जेतेपद…’, शेन वॉटसनने केली मोठी भविष्यवाणी, पाहा VIDEO
आरसीबीच्या जेतेपदासाठी चाहत्याचं देवाकडे साकडं –
व्हिडिओमध्ये हा चाहता आरसीबीची जर्सी परिधान करून मंदिरात पूजेचं ताट घेऊन पोहोचला आहे. त्या ताटात एक चिठ्ठी आहे, ज्यावर लिहिलं आहे, “देवा, कृपया विराट कोहलीला आयपीएल ट्रॉफी उंचावण्याची संधी दे.” ही चिठ्ठी देवासमोर ठेवून तो मनोभावे प्रार्थना करताना दिसत आहे.
हेही वाचा – LSG vs RCB : गोलंदाजाच्या अपमानावर अश्विन संतापला, पंतला सुनावलं, काय आहे प्रकरण?
आरसीबीने यापूर्वी २०१६ मध्ये पहिला क्वालिफायर सामना खेळला होता, जेव्हा ते ट्रॉफी जिंकण्याच्या जवळ पोहोचले होते, पण अंतिम सामन्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर आरसीबीला जेतेपद मिळवता आलेलं नाही. मात्र, यंदाचा आरसीबी संघ वेगळ्या जोमाने खेळत आहे. कोणत्याही एका खेळाडूवर अवलंबून न राहता, संपूर्ण संघाने सातत्यपूर्ण आणि दमदार कामगिरी केली आहे.





