कांद्याच्या वाढत्या किमतीमुळे रिझर्व्ह बँक चिंतेत

नवी दिल्ली : देशभरातील कांद्याच्या आकाशात चढणार्या किंमतींनी रिझर्व्ह बँकेला चिंतेत टाकले आहे. या महिन्याच्या सुरुवातीस रिझर्व्ह बॅंकेच्या चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत कांद्याचा मुद्दा उपस्थित केला.
रिझर्व्ह बँकेने गुरुवारी बैठकीचा तपशील प्रसिद्ध केला. सप्टेंबरपासून देशभरात कांद्याचे दर वाढले आहेत. दिल्लीत कांद्याची सरासरी किंमत १३०-१४० रुपये प्रति किलो झाली आहे.
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शशीकांत दास यांनी बैठकीत सांगितले की सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईत मोठी वाढ झाली आहे. देशातील बर्याच भागात भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. अवेळी झालेल्या पावसामुळे खरीप पिकाचे नुकसान झाल्यामुळे किरकोळ महागाई वाढली आहे असल्याचे त्यांनी सांगितले
या बैठकीत रेपो दर कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. दास यांच्यासमवेत चेतन घाटे, पामी दुआ, रवींद्र एच ढोलाकिया, मायकेल देवव्रत पत्र आणि विभूप्रसाद कानूनगो यांनी रेपो दर 5.15 टक्के ठेवण्याच्या बाजूने मतदान केले.
रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर कानूनगो यांनीही दास यांच्या वक्तव्याचा पुनरुच्चार करीत मागणी व पुरवठा यांच्यात असमतोल झाल्याने कांद्याच्या किंमती वाढल्याचे ते म्हणाले.
दास म्हणाले की कांदा आणि इतर भाज्यांच्या किंमती वाढल्यामुळे गेल्या तीन महिन्यांत अन्नधान्याच्या महागाईत वाढ झाली आहे. बाजारात खरीप पिकांच्या उशीरा पेरणीमुळे परिस्थितीत हळूहळू सुधारणा होण्याची शक्यता




