Good News For UPI Users : UPI वापरणाऱ्यांसाठी गुडन्यूज! 1 जानेवारीपासून लागू होणार ‘ही’ सुविधा

तुम्ही जर UPI चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. 1 जानेवारीपासून UPI च्या नियमांमध्ये बदल होणार आहे. रिझर्व्ह बँकेने डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्यासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमानुसार वापरकर्ते आता कोणत्याही UPI ॲपचा वापर करून डिजिटल वॉलेटद्वारे पेमेंट करू शकतात. मात्र यासाठी KYC पूर्ण करणे आवश्यक आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने अलीकडेच फीचर फोन वापरकर्त्यांसाठी एक चांगली बातमी दिली आहे. आता UPI 123Pay वापरून 10,000 रुपयांपर्यंतचे UPI पेमेंट केले जाऊ शकते. ही सुविधा 1 जानेवारी 2025 पासून सुरू होणार आहे. पूर्वी ही मर्यादा 5 हजार रुपये होती. रिझर्व्ह बँकेने UPI ट्रांझेक्शन आणि वॉलेट पेमेंटच्या लिमिट बदलल्या आहेत.
त्यामुळे आता प्रीपेड वॉलेट फोनपे, यूपीआय आणि पेटीएम वापरणे सोपे झाले आहे, परंतु या नवीन नियमाचा फायदा घेण्यासाठी वॉलेटचे केवायसी पूर्ण असणे आवश्यक आहे आणि वॉलेट ॲपशी लिंक असणे गरजेचे असणार आहे. जेव्हा तुम्ही वॉलेटमधून UPI पेमेंट कराल, तेव्हा आधी पेमेंट मंजूर केले जाईल, त्यानंतर तुम्हाला UPI ॲपमध्ये प्रवेश मिळेल, परंतु त्यात तुम्हाला कोणतीही बँक किंवा वॉलेट जोडता येणार नाही.





