Bank Account Close : 1 जानेवारीपासून ‘ही’ बँक खाती होणार बंद; RBI चा मोठा निर्णय

अवघ्या काही तासांनी नवीन वर्षाला सुरुवात होणार आहे. नवीन वर्षांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने बँकींग सिस्टीममध्ये नवीन बदल करण्याची घोषणा केली आहे. त्याचा परिणाम कोट्यवधी लोकांवर होऊ शकतो. रिझर्व्ह बँकेचा हा नवीन नियम बँक खात्यांवर लागू होणार आहे. या नियमानुसार तीन प्रकारची बँक खाती बंद होणार आहेत. यामध्ये कोणत्या खात्यांचा समावेश आहे जाणून घेऊया…
झिरो बॅलन्स खाते
ज्या बँक खात्यात खूप काळापासून शून्य बॅलन्स आहेत त्या खात्यांना देखील १ जानेवारीपासून बंद करण्यात येणार आहे. अशा खात्यांचा दुरुपयोग टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या निर्णयाचा हेतू ग्राहकांना आपल्या खात्याचा वारंवार वापर करण्यास प्रोत्साहन देणे हा देखील आहे. जर तुमच्या खाते बराच काळ शून्य बॅलन्स आहे तर तुम्ही लागलीच तुमच्या नजीकच्या शाखेत जाऊन केवायसी करून घ्या.
डोरमेट खाते
हे एक असे खाते आहे.ज्या दोन किंवा अधिक वर्षांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले नाही. अशी खाती सायबर गु्न्हेगारांच्या निशाण्यावर असतात. अशी खाती हॅक केली जाऊ शकतात. तसेच या खात्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाऊ शकते.
इनएक्टीव्ह खाते
जी बँक खाती गेल्या १२ महिन्यांपासून कोणतेही ट्राझक्शन झालेले त्या खात्यांनी इनएक्टीव्ह कॅटगरीत टाकले जाणार आहे. जर कोणत्या खातेधारकाने एक वर्ष किंवा त्याहून अधिक काळ आपल्या बँक खात्यात कोणताही व्यवहार केलेला नाही तर अशा स्थिती या खात्यांना इनएक्टीव्ह कॅटगरीत टाकत बंद केले जाणार आहे.
का घेण्यात आला निर्णय ?
फसवणूकीच्या प्रकारांना रोखण्यासाठी आरबीआयकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. बँकींग क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी, डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायबर गुन्हेगारीचा धोका कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.





