Mohammad Shami : ‘भाड़ में गयी बिर्यानी’: शमीच्या रागाने भारताला मिळवून दिला होता ऐतिहासिक विजय!

Mohammad Shami Biryani Outburst : भारतीय क्रिकेट संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण यांनी मोहम्मद शमीबाबत एक रंजक किस्सा सांगितला आहे. एकदा दुपारच्या जेवणावेळी बिर्यानी खाण्याबाबत टोकले गेल्याने मोहम्मद शमी चांगलाच संतापला होता. ज्यामुळे तो म्हणाला होता की, ‘नहीं चाहिए बिरयानी, भाड़ में गयी बिरयानी’ असे म्हणत तो उठून निघून गेला. पण जेवणानंतरच्या सत्रात त्याने आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघात खळबळ उडवून दिली.
मोहम्मद शमीने त्या सामन्यात ५ विकेट्स घेत भारताला अशा परदेशी मैदानावर विजय मिळवून दिला, जिथे आपण सहसा एका विजयासाठी तडफडत असतो. रवी शास्त्री आणि भरत अरुण यांनी सोनी स्पोर्ट्सवर हा रंजक किस्सा सांगितला. ही गोष्ट २०१८ ची आहे. जोहान्सबर्ग येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्याच्या पाचव्या दिवसाच्या लंचवेळी हा वाद झाला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी अजून २२३ धावांची गरज होती, आणि त्यांच्याकडे ८ गडी शिल्लक होते.
मोहम्मद शमीच्या बिर्याणीचा काय आहे किस्सा?
“𝘏𝘶𝘮𝘬𝘰 𝘩𝘶𝘮𝘦𝘴𝘩𝘢 𝘨𝘶𝘴𝘴𝘢 𝘬𝘢𝘳𝘢𝘰… 𝘱𝘩𝘪𝘳 𝘵𝘩𝘦𝘦𝘬 𝘩𝘰 𝘫𝘢𝘢𝘵𝘢 𝘩𝘢𝘪!” 🤭
Ravi Shastri & Bharat Arun drop a gem on Mohammed Shami, form, and… BIRYANI. 👀
Watch ‘Bharat Chale Chalo, Kahani 21-22 ki’ only on Sony Sports Network TV channels & Sony LIV.… pic.twitter.com/1RpouJhKlg
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) June 17, 2025
पहिले दोन कसोटी सामने जिंकून दक्षिण आफ्रिकेच्या संघाने आधीच मालिका खिशात घातली होती, आणि आता त्यांचा डोळा व्हाईटवॉशवर होता. लंचच्या वेळी मोहम्मद शमी बिर्यानी खाण्यावरून भांडत होता. तेव्हा जवळून जाणारे प्रशिक्षक रवि शास्त्री यांचे लक्ष शमीच्या ताटाकडे गेले आणि त्यांनी शमीला टोकले. शास्त्री यांनी सोनी स्पोर्ट्सला सांगितले, “आम्ही जोहान्सबर्गमध्ये होतो. फायनल डेचा दिवस होता. सामन्यात खूपच तगडी स्पर्धा सुरू होती. दुपारच्या जेवणाची वेळ झाली होती आणि मी तिथून जात असताना माझी नजर शमीच्या थाळीवर पडली. ती बिर्यानीने भरलेली होती.”
हेही वाचा – SL vs BAN : शतकानंतर आक्रमक सेलिब्रेशन करताना शांतोची अचानक उडाली भंबेरी, VIDEO होतोय व्हायरल
शमीने बिर्याणीचा राग दक्षिण आफ्रिकेवर काढला –
भरत अरुण यांनी पुढील किस्सा सांगितला की, शास्त्री शमीजवळ गेले आणि त्याच्या थाळीतली बिर्यानी पाहून त्यांनी शमीच्या भुकेसंदर्भात प्रश्न विचारला. अरुण म्हणाले, “रवी तिथे गेले आणि शमीला विचारले, ‘तुझी भूक इथे नीट भागली का?'” शास्त्रींनी असं बोलताच मोहम्मद शमी चांगलाच संतापला आणि रागाच्या भरात म्हणाला, ‘नहीं चाहिए बिरयानी, भाड़ में गयी बिरयानी’ त्यानंतर शास्त्रींनी गोलंदाजी प्रशिक्षक अरुण यांना सल्ला दिला की शमीला एकटं सोडावं. ते म्हणाले, “रवि माझ्याकडे आले आणि म्हणाले, ‘तो (शमी) रागात आहे, त्याला एकटं सोडा. त्याला काही बोलायचं असेल, तर सांगा, थोडे विकेट्स घेऊन मला दाखव!’”
हेही वाचा – IND vs ENG : इंग्लंडचा कट! भारताला फसवण्यासाठी लीड्सच्या खेळपट्टीवर घातक डाव, क्युरेटरने वाढवली धडधड
एकट्या शमीने सातपैकी घेतल्या पाच विकेट्स –
यानंतर मोहम्मद शमी रागात बिर्याणीची ताटं सोडून गेला, पण मैदानावर त्यानी प्रतिस्पर्धी संघावर आपला राग काढत खळबळ माजवली. ज्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या शेवटच्या ७ विकेट्स अवघ्या २२ धावांच्या आत पडल्या. ज्यापैकी ५ विकेट्स एकट्या शमीने घेतल्या आणि भारताने तो सामना ६३ धावांनी जिंकला. वांडरर्स स्टेडियममधील तो भारताचा दुसरा आणि दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर एकूण तिसरा विजय होता. सामना जिंकल्यानंतर भरत अरुण यांनी शमीला ती प्लेट देत म्हटलं, “बिर्यानी घे, आता जितकं खायचंय तितकं खा.” विजयाच्या आनंदात वातावरण खूपच हलकं आणि उत्साही झालं होतं.





