Ranji Trophy 2025 : रणजीच्या चौथ्या फेरीत एकाच दिवशी तीन संघांचा डावांनी विजय! सूचित, मुलानी, मावी ठरले दिवसाचे हिरो

Ranji Trophy 2025 Updates : रणजी ट्रॉफी २०२५-२६ च्या चौथ्या फेरीतील तिसऱ्या दिवसाचा (११ नोव्हेंबर) खेळ अनेक मोठ्या निकालांसह संपुष्टात आला. ८ नोव्हेंबरला सुरू झालेल्या या फेरीत सहभागी झालेल्या ३८ संघांपैकी अनेक सामन्यांचे निकाल लागले आहेत. या दिवशी उत्तराखंड, मुंबई आणि उत्तर प्रदेश या संघांनी एक डाव राखून दणदणीत विजय नोंदवले, तर एका रोमांचक लढतीत आंध्र प्रदेशने तामिळनाडूला पराभूत केले.
उत्तराखंडचा ऐतिहासिक विजय:
उत्तराखंडने हरियाणाला एका डाव आणि २८ धावांनी पराभूत केले. उत्तराखंडने पहिल्या डावात २८८ धावा केल्यानंतर, हरियाणाचा संघ पहिल्या डावात ११२ आणि फॉलो-ऑननंतर दुसऱ्या डावात केवळ १४८ धावांवर ऑल आऊट झाला. उत्तराखंडच्या जगदीश सूचित याने दोन्ही डावांत मिळून ११ विकेट्स घेत संघाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
मुंबईची दमदार कामगिरी:
Mumbai secures a win in the Ranji Trophy Elite match against Himachal Pradesh 🏆
After a strong first innings, Mumbai enforced the follow-on and sealed the win in style.
Musheer Khan emerged as the player of the match!#MCA #Mumbai #Cricket #RanjiTrophy pic.twitter.com/rqLuVva2bM
— Mumbai Cricket Association (MCA) (@MumbaiCricAssoc) November 10, 2025
मुंबईने हिमाचल प्रदेशला एक डाव आणि १२० धावांनी चिरडले. मुंबईने ४४६ धावांचा मोठा डोंगर उभा केला होता, ज्यात मुशीर खान (११२) आणि सिदेश लाड (१२७) यांच्या शतकांचा समावेश होता. या धावसंख्येसमोर हिमाचल प्रदेशचे दोन्ही डाव अनुक्रमे १८७ आणि १३९ धावांवर आटोपले. मुंबईसाठी शम्स मुलानीने दुसऱ्या डावात ५ विकेट्स घेत संघाला विजय मिळवून दिला.
हेही वाचा – IPL Trade Window Rules : आयपीएलमध्ये कशी होती खेळाडूंची ट्रेडिंग? काय आहेत नियम? जाणून घ्या
उत्तर प्रदेशचा रेकॉर्डब्रेक विजय:
उत्तर प्रदेशने नागालँडला एक डाव आणि २६५ धावांनी मात देत मोठा विजय नोंदवला. यूपीने ५३५ धावांचा विशाल स्कोर उभारल्यानंतर नागालँडचे दोन्ही डाव (११७ आणि १५३) लवकर आटोपले. अष्टपैलू कामगिरी करणारा शिवम मावी या विजयाचा नायक ठरला. त्याने फलंदाजीत १०१ धावांचे शतक ठोकले आणि पहिल्या डावात ५ विकेट्स घेतले.
हेही वाचा – Anaya Bangar Video : RCB किटबॅग, धडाकेबाज शॅडो! अनाया बांगरची दुसरी इनिंग येणार? VIDEO तुफान व्हायरल
आंध्राने तामिळनाडूचा केला –
तामिळनाडू आणि आंध्र यांच्यातील सामना रोमांचक झाला. पहिल्या डावात तामिळनाडूने १८२ धावा केल्या आणि आंध्राचा संघ १७७ धावांवर गारद झाला. दुसऱ्या डावात तामिळनाडूने १९५ धावा केल्या आणि आंध्राला विजयासाठी २०१ धावांचे लक्ष्य दिले. आंध्राने हे लक्ष्य ६ विकेट्सच्या मोबदल्यात गाठले आणि सामना ४ विकेट्सने जिंकला.





