Anaya Bangar Video : RCB किटबॅग, धडाकेबाज शॅडो! अनाया बांगरची दुसरी इनिंग येणार? VIDEO तुफान व्हायरल

Anaya Bangar Viral Video With RCB Kit bag : महिला प्रीमियर लीग (WPL) २०२५ स्पर्धेचा बिगुल वाजला असून आगामी हंगामापूर्वी सर्व पाच संघांमध्ये मोठे बदल झाले आहेत. याच दरम्यान, सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असलेल्या अनाया बांगर हिने आपल्या इन्स्टावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे क्रिकेट जगतात पुन्हा तिची चर्चा सुरू झाली आहे. या व्हिडिओमध्ये आरसीबी संघाची किटबॅग घेऊन मैदानावर फलंदाजीचा सराव करताना दिसत आहे.
अनायाचा व्हिडिओ व्हायरल, RCB सोबतचे कनेक्शन!
अनाया बांगर, जी लिंगबदल शस्त्रक्रियेनंतर भारतीय महिला क्रिकेट संघात खेळण्याची इच्छा व्यक्त करून चर्चेत आली होती, तिचे क्रिकेटवरील प्रेम पुन्हा एकदा या व्हिडिओमधून स्पष्ट झाले आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, अनाया आरसीबीची किटबॅग घेऊन मैदानात प्रवेश करते. ती जॉगिंग, वॉर्म-अप आणि स्ट्रेचिंगनंतर पॅड आणि हेल्मेट घालून फलंदाजीचा सराव (शॅडो प्रॅक्टिस) करताना दिसत आहे. कव्हर ड्राईव्ह मारतानाचा तिचा अंदाज लक्ष वेधून घेणारा आहे.
या व्हिडिओला अनायाने एक हटके कॅप्शन दिले आहे: “माझं आयुष्य बदललं असलं तरी देखील माझं [क्रिकेटवरील प्रेम] तेच आहे.”
View this post on Instagram
हेही वाचा – Ajinkya Naik : अजिंक्य नाईक बिनविरोध! MCA अध्यक्षपदावर दुसरा कार्यकाळ पक्का, दिग्गजांची माघार
आर्यन ते अनाया बांगर: एक नवी ओळख
अनायाचे क्रिकेट कनेक्शन खूप जुने आहे. ‘आर्यन’ म्हणून ती मुंबई संघाकडून खेळायची. सर्फराझ खान आणि मुशीर खान यांसारखे खेळाडू तिच्यासोबत एकाच संघातून खेळले आहेत. मात्र, त्यानंतर आर्यनने हार्मोन रिप्लेसमेंट थेरपी करून लिंगबदल शस्त्रक्रिया करण्याचा धाडसी निर्णय घेतला, ज्यामुळे तिला आता अनाया बांगर ही नवी ओळख मिळाली आहे.
हेही वाचा – Sanju Samson : संजू सॅमसनच्या एक्झिटनंतर RR ची कमान कोण सांभाळणार? ‘या’ तिघांमध्ये जोरदार चुरस!
अनाया बांगरचे वडील संजय बांगर हे भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाला देखील प्रशिक्षण दिले आहे. संजय बांगर यांनी भारतीय संघाकडून १२ कसोटी सामने खेळले आहेत. सध्या ते प्रशिक्षकाच्या भूमिकेत कार्यरत आहेत. अनाया बांगरच्या या व्हिडिओमुळे, डब्ल्यूपीएल 2025 मध्ये ती खेळाडू म्हणून किंवा अन्य भूमिकेत आरसीबीशी जोडली जाते का, याबद्दल क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे.





