Ranji Trophy 2024 : शमीचे यशस्वी पुनरागमन, बंगालचा मध्य प्रदेशवर 11 धावांनी शानदार विजय….

Ranji Trophy 2024 (Mohammad Shami) :- मोहम्मद शमीच्या ७ बळीच्या जोरावर बंगालने मध्य प्रदेश संघाला ११ धावांनी पराभूत करताना रणजी करंडक स्पर्धेतील विजयाची नोंद केली.
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी गेल्या वर्षभरापासून घोट्याच्या दुखण्याने त्रस्त होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया देखील करण्यात आली होती. मात्र दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला जवळपास वर्षभराचा कालावधी लागला. त्रासातून मुक्त झाल्यानंतर त्याने हलक्या सरावाला देखील सुरुवात केली होती. मात्र न्यूझीलंड भारताच्या दौऱ्यावर असताना सरावादरम्यान पुन्हा एकदा त्याचा घोट्याला सूज आली होती. मात्र त्यानंतर त्याच्या त्याने आपली तंदुरुस्ती सिद्ध करताना बंगाल संघाकडून रणजी करंडक स्पर्धेत तो उतराला.
मध्य प्रदेश विरुद्धच्या लढतीमध्ये मोहम्मद शमीने जवळपास ४३.२ षटके गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात १९ तर दुसऱ्या डावात २४ षटके गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात ३ असे एकूण ७ बळी टिपताना आपली तंदुरुस्ती सिद्ध केली आहे. मध्यप्रदेशला विजयासाठी ११ धावांची आवश्यकता असताना बंगालचा कर्णधार अनुस्तुप मुझुमदारने शमीवर विश्वास दाखविला. शमीने भन्नाट चेंडूवर कुमार कार्तिकेयला रोहित कुमारकडे झेल देण्यास भाग पाडले आणि बंगालला विजय मिळवून दिला.
अकरा धावांनी बंगालचा विजय
विजयासाठी ३३८ धावांचे लक्ष्य घेऊन दुसऱ्या डावात उतरलेल्या मध्यप्रदेश संघाचा डाव ३२६ धावांवर संपुष्टात आला. शेवटच्या दिवशी मध्यप्रदेश संघाने १ बाद १०३ पासून पुढे खेळायला सुरुवात केली. मध्यप्रदेश संघाकडून सुभ्रांशु सेनापतीने ५०, रजत पाटीदारने ३२, कर्णधार शुभम शर्माने ६१, व्यंकटेश अय्यरने ५३, सारांश जैनने ३२ तर आर्यन पांडेने २२ धावांचे योगदान दिले. बंगाल संघाकडून शाहबाज अहमदने ४८ धावांच्या मोबदल्यात ४ तर मोहम्मद शमीने १०२ धावांच्या मोबदल्यात ३ गडी बाद केले. रोहित कुमारने २ तर मोहम्मद कैफने १ गडी बाद केला.





